Today’s Horoscope 01 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 01 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य 

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

01.04.2023.

 शुभाशुभ विचार- 15 पर्यंत चांगला.

आज विशेष- कामदा एकादशी.

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30. 

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – आश्लेषा.

चंद्र राशी – कर्क.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- सोनेरी )

जमीन शेतीवाडी खरेदी विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना कठीण विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

वृषभ (शुभ रंग- भगवा )

आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्यावा.

मिथुन ( शुभ रंग- राखाडी )

व्यावसायिकांची मिळकत उत्तम असेल गृहिणींना अचानक येणारे पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवासात फार दगदग होईल. कार्यक्षेत्रात       वावरताना वाणीत गोडवा असू द्या.

कर्क (शुभ रंग- आकाशी)

कमी श्रमांत जास्त लाभाच्या अपेक्षेने आज निराशाच पदरात पडेल. महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचारांती घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले उपयुक्त ठरतील.

सिंह (शुभ रंग- मोरपंखी)

आज अहंकार प्रगतीच्या आड येऊ शकतो. गोड बोलून बरीच अवघड कामे सोपी करता येतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडू शकतो. पण प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

कन्या ( शुभ रंग- चंदेरी)

आजचा दिवस तुमच्यासाठी सर्व दृष्टीने अनुकूल असा आहे. आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मक रीतीने पार पडतील. जिवलग मित्राकडून आज तुम्हाला अपेक्षित सहकार्य लाभेल.

तूळ ( शुभ रंग- केशरी)

यशस्वी लोकांच्या सहवासात आज तुमचाही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे जमणार नाही. आज अतिश व्यस्त दिवस.

वृश्चिक (शुभ रंग- जांभळा)

आज घरात वडीलधाऱ्या मंडळी बरोबर तुमचे काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. आज तुम्हाला जरा एकांताची गरज असणार आहे. ज्येष्ठ मंडळींची पावले सत्संगाकडे आपोआपच वळतील.

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका. नोकरीच्या ठिकाणी आज नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा. अन्यथा हितशत्रू टपूनच बसलेले आहेत. सतर्क रहा.

मकर ( शुभ रंग- मरून )

व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असून काही जुन्या स्मृती म्हणाला आनंद देतील. आशादायी दिवस.

कुंभ (शुभ रंग – जांभळा)

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील. आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. दुकानदारांची थकलेली येणी वसूल होतील.

मीन -(शुभ रंग – निळा )

नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. शेअर मार्केट विषयी तुमचे अंदाज अचूक ठरतील.

शुभम भवतु 
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क-9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.