Today’s Horoscope 01 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 01 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 01.04.2024.

शुभाशुभ विचार- 9 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 7.30  ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – मूळ 23.12 पर्यंत नंतर पूर्वा शाढा.

चंद्र राशी – धनु.
—————————–
मेष ( शुभ रंग- लाल)

नोकरदारांना आज जास्त वेळ थांबून कामे पूर्ण करावी लागतील. नोकरीच्या ठिकाणी सहकारी वर्गाशी काही मतभेद संभवतात. दैवाची साथ आज शंभर टक्के राहील.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

आज तुमच्या मनात काही नकारात्मक विचार येतील. व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. वैवाहिक जीवनातले मतभेद सुसंवादाने मिटवणे हिताचे.

मिथुन (शुभ रंग – हिरवा)

उत्साहाने व सकारात्मकतेने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. तुमचा कामातील उरक चांगला असेल. आज अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

कर्क ( शुभ रंग- पांढरा)

अत्यंत व्यस्त असा आजचा दिवस आहे. कोणत्याही कार्यक्षेत्रात असलात तरीही तीव्र स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. काही येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे.

सिंह ( शुभ रंग- डाळिंबी)

आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी तुमच्याकडून होईल आज तुम्ही सहकुटुंब मौजमजेस प्राधान्य द्याल.

कन्या (शुभ रंग- क्रीम)

तुमच्या सामाजिक प्रतिष्ठित वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच. गृह सौख्याचा दिवस.

तूळ (शुभ रंग- राखाडी)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज तुम्ही बराच वेळ घराबाहेर असाल. गृहणी शेजार धर्म पाळतील. तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. मनावर ताबा गरजेचा.

वृश्चिक ( शुभ रंग- मरून)

आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळाल. हार्डवर्क न करता आज स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल असेल.

धनु (शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. मन हळवी करणारा एखादा प्रसंग घडेल.

मकर (शुभ रंग- चंदेरी)

जे चाललंय ते बरंच चाललंय म्हणायला हवं. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह धरू नका. धाडसाची कामे आज टाळली तर बरे होईल. खर्च प्रमाणा बाहेर जाणार आहे. बचत आज शक्य नाही.

कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

लाभस्थानातील चंद्रभ्रमण आवक वाढवेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी आज चैनीच्या वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस.

मीन (शुभ रंग- आकाशी)

नवीन व्यावसायिकांना यशाची चाहूल लागेल. आज व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के राहील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.