Today’s Horoscope 01 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार    मंगळवार  ….. ​दि​.  01 डिसेंबर 2020

  • शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी ०३.००  ते ०४.३०.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रोहिणी ०८.३१ पर्यंत, नंतर मृग
  • चंद्र राशी – वृषभ २१.३७ पर्यंत नंतर मिथुन.

आजचे राशीभविष्य

मेष( शुभ रंग -मोतिया )

व्यवसायात नवीन हितसंबंध तयार होतील. कार्यक्षेत्रात काही फायदेशीर घडामोडी घडतील. तब्येत उत्तम राहील. आर्थिक संकटे पळ काढतील. दूरच्या प्रवासात खोळंबा होईल.

वृषभ – ( शुभ रंग -सोनेरी )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. विरोधक तुमचा नाद सोडून देतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील.

मिथुन  ( शुभ रंग -केशरी )

कार्यक्षेत्रातील काही अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या जुन्या ओळखी आज कामी येतील. आज काही देणी चुकवावी लागतील, हौस मौज करण्यावर मर्यादा येतील.

कर्क( शुभ रंग- हिरवा )

वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पैशाची कमतरता भासणार नाही.  आज गृहसौख्याचा दिवस असून मित्रपरिवारात तुमच्या शब्दाचा मान राहील.

सिंह –  ( शुभ रंग- मरून )

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. अति स्पष्टवक्तेपणा ने काही नाती दुरावतील.

कन्या ( शुभ रंग – डाळिंबी )

अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकला. शासकीय कामे रखडणार आहेत. गृहिणींचा आज देव धर्माकडे ओढा राहील.

तूळ ( शुभ रंग – चंदेरी )

 कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गात काही अडथळे संभवतात. विरोधकांचा जोर वाढलेला आहे.  शारीरिक कष्टाची कामे करणार्‍यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.

वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)

आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामातील उरक चांगला राहील. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.

धनु ( शुभ रंग- जांभळा)

 कार्यक्षेत्रात श्रम कारणी लागतील घरात थोरांचे मूड मात्र सांभाळावे लागतील. आज विश्रांतीस ही प्राधान्य देणे गरजेचे आहे रुग्णांनी पथ्य पाण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

मकर – (शुभ रंग गुलाबी)

आज घरात आधुनिक सुख सुविधांसाठी खर्च कराल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील.  आज फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेले बरे.

कुंभ ( शुभ रंग – मोरपिशी)

आज कोणत्याही स्पर्धेत अंतिम विजय तुमचाच राहील. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. घरात आर्थिक सुबत्ता नांदेल. मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडतील

मीन  (  शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

रिकामटेकड्या गप्पा टाळा कारण त्यातून फक्त गैरसमज पसरतील. आज टेलिफोन व लाईट बिले भरावी लागतील. बेरोजगारांची वणवण चालूच राहील. शेजारी डोकावून बघतील पण आपलेपणाने.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.