Todays Horoscope 01 December 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – बुधवार, दि. 01.12.2021

  • शुभाशुभ विचार – शुभ दिवस
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – चित्रा 18.47 पर्यंत नंतर स्वाती.
  • चंद्र राशी – कन्या 07.45 पर्यंत नंतर तुळ

————————————

आजचे राशीभविष्य–

मेष –  धंद्यातील आवक-जावक समान राहील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. कार्यक्षेत्रात समोर येणारी नवीन आव्हाने आनंदाने स्वीकाराल.

वृषभ – ( शुभ रंग- निळा )

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या शाब्बासकिस बळी जाऊ नका. हाताखालच्या लोकांशीही सलोख्याचे संबंध गरजेचे आहेत. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये.

मिथुन – (शुभ रंग – चंदेरी )

विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. आपला बडेजाव दाखवण्यासाठी खर्च कराल. आज संध्याकाळी सहकुटुंब मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या आस्वाद घ्याल.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

दैनंदिन कामाचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे काही तरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. महिलांना गृहोद्योगातून चांगली कमाई होईल.

सिंह – (शुभ रंग – पांढरा )

अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील.  नवीन झालेल्या ओळखीत स्वतःचे हित साधून घ्याल. गृहिणी आज आपल्या आवडत्या छंदास प्राधान्य देतील.

कन्या- ( शुभ रंग- जांभळा )

मिळकत पुरेशी असली तरीही आज बचतीला प्राधान्य देणे हिताचे राहील. गृहिणी आज सांसारिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पडतील. आनंदी दिवस.

तूळ- ( शुभ रंग – पिस्ता )

घराबाहेर वावरताना आपला रागीट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कुणी शेरास सव्वाशेर भेटू शकतो. नेतेमंडळींची भाषणे प्रभावी होतील.

वृश्चिक- ( शुभ रंग- भगवा )

कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावे लागणार आहेत. अधिकारी वर्गास कामगारांचे प्रश्‍न सोडवावे लागतील. महत्वाच्या चर्चा व बैठकी उद्यावर ढकला.

धनु – ( शुभ रंग- राखाडी)

आज तुमची मोठ्या लोकांमधील ऊठबस फायदेशीर राहील विवाहेच्छुकांना अनुरूप स्थळांचे प्रस्ताव येतील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ होऊ शकतो.

मकर – (शुभ रंग- आकाशी )

हौस मौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. वाहतुकीचे नियम मोडले तर दंड चुकणार नाही. आपल्या प्रतिष्ठेस जपा. आज कायद्यात राहिलात तरच फायद्यात राहाल.

कुंभ (शुभ रंग -केशरी )

आज काही अयोग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. आज एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीकडून योग्य सल्ला मिळेल.

मीन – ( शुभ रंग तांबडा )

व्यवसायात महत्त्वाचे करार मदार यशस्वी होतील वैवाहिक जीवनात दोघात एक मत राहील. आनंदी दिवस असून तुमचे प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील.

शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.