Today’s Horoscope 01 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 01 December 2022
वार – गुरूवार.
01.12.2022.
शुभाशुभ विचार- दुर्गाष्टमी.
आज विशेष- बुधाष्टमी.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र -पूर्वा भाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ 23.48 पर्यंत नंतर मीन.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- भगवा )
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज कुटुंबीयांचे हट्ट हौशीने पुरावाल. मित्रमंडळीत आज तुमच्या शब्दास मान राहील.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल. मोठे व्यवसायिक निर्णय सकारात्मकतेने घ्याल. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्याल. कार्यक्षेत्रातही अनुभवींचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. त्यासाठी तुमच्याच काही जुन्या तत्त्वांना मात्र मुरड घालावी लागणार आहे. तुमच्या प्रयत्नांस आज दैव अनुकूल राहील.

कर्क (शुभ रंग- सोनेरी.)
कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका काढण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची उगीच घाई करू नका. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा.

सिंह (शुभ रंग- केशरी )
केवळ भडस्तपणापायी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या आज स्वीकारूच नका. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची ही गरज आहे जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. भागीदारांशी सुसंवाद ठेवा.

कन्या ( शुभ रंग- नारंगी )
आज तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. फार काळजी करू नका परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी थोडे नमतेच घेतलेले बरे.

तूळ ( शुभ रंग- लाल)
आज तरुण वर्गात चैनी व विलासी वृत्ती वाढेल. आज आपल्याच मनाप्रमाणे वागण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणी वाटेल.

वृश्चिक (शुभ रंग-निळा)
गृहिणी आज घराच्या सजावटीसाठी पैसे खर्च करतील. नवोदित कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील.प्रेमीयुगुलांनी तर आजच्या दिवस मौन व्रत ठेवणेच त्यांच्याच हिताचे राहील.

धनु- (शुभ रंग- गुलाबी) – Today’s Horoscope 01 December 2022
वास्तु व वाहन खरेदीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रामतील वाहन रस्त्यात नादुरुस्त होण्याची शक्यता आहे.

मकर ( शुभ रंग- राखाडी )
एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांशी मदत घ्यावी लागेल. आज तुम्ही गोड बोलून आपल्या विरोधकांनाही आपलेसे कराल. दुरावलेले काही मित्र आज जवळ येतील.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी)
आपल्या कार्यक्षेत्रात इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवण्याची तुमची जिद्द राहील. विरोधकांनाही तुमची मते पटवून देऊ शकाल. ज्येष्ठांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.

मीन -(शुभ रंग – मोतिया )
घरात थोरामोठ्यांशी काही वैचारिक मतभेद संभवतात. त्यांच्या वयाचा मात्र मान राखणे गरजेचे आहे. आज एखादा अनपेक्षित खर्च उद्भवेल. जो टाळता येणार नाही आज वाद टाळा व सुसंवाद साधा.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Nagnath Kottapalle : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.