Today’s Horoscope 01 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार – सोमवार, ​दि​. 01 मार्च 2021

  • शुभाशुभ विचार –क्षयदिन.
  • आज विशेष –साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तरा 07.37 पर्यंत नंतर हस्त.
  • चंद्र राशी – कन्या.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- राखाडी)

नोकरदार मंडळी वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. आज अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल. आज येणी वसूल होतील व देणीही ही द्यावी लागतील.

वृषभ – ( शुभ रंग- डाळिंबी)

आज तुम्ही कर्तव्या पेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल, विलासी वृत्ती बळावेल, कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींच्या महत्वकांक्षा वाढणार आहेत प्रेम वीरांसाठी आज ग्रीन सिग्नल आहे.

मिथुन – ( शुभ रंग – पिस्ता)

कौटुंबिक जीवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची चणचण भासणार नाही. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चूकण्याची शक्यता आहे.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)

आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येऊन मनाजोगत्या नोकरीचे प्रस्ताव येतील. व्यवसायात जाहिरातीवर चा खर्च वाढवावा लागेल.

सिंह – ( शुभ रंग- हिरवा)

केवळ चर्चेपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. वक्त्यांची भाषणे प्रभावी होती. आज कोणालाही न मागता सल्ला देऊ नका. शब्दांचा वापर जपून करा.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – ( शुभ – रंग भगवा)

आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारू नका. महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या वेळी द्विधा मनस्थिती होणार आहे. अती धावपळ टाळा हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या.

तूळ – (शुभ रंग- नारिंगी)

आज व्यवसायात तुम्हाला वाढती स्पर्धा बेचैन करेल. इतरांनी दिलेल्या आश्वासनांवर मुळीच अवलंबून राहू नका. जमाखर्चाचा तराजू डळमळीत होणार आहे. अनावश्यक खर्चाला लगाम द्यायलाच हवा.

वृश्चिक – ( शुभ रंग  केशरी)

कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह जुळवणी विषयी  बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य आहे. वास्तू किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल. विद्यार्थ्यांची कामगिरी कौतुकास्पद असेल.

धनु – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

व्यावसायिक नवे करार यशस्वी होतील. यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. व्यावसायिकांच्या अपेक्षा अजून वाढतील. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल.

मकर – ( शुभ रंग- गुलाबी)

ज्येष्ठ मंडळींनी तरुणांना सल्ले देण्याचा ठेका घेऊ नये. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असणे हिताचे राहील. आजी-आजोबांनी घरगुती प्रश्‍नात लक्ष न घालता नातवंडाबरोबर रमावे.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. काही गोड बोली माणसे भेटतील पण त्यांना वेळीच गुड बाय करणे हिताचे राहील. गाडी चालवताना कोणतीही रिस्क नको.

मीन – ( शुभ रंग -आकाशी)

तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. अनेक किचकट कामे मार्गी लागतील. सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. मोहात तडकण्याचे क्षण टाळा. जोडीदाराचे मन जपायला हवे.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.