Today’s Horoscope 01 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – शनिवार. 01 मे  2021

  • शुभाशुभ विचार — चांगला दिवस.
  • आज विशेष – महाराष्ट्र दिन.
  • राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मूळ 10.15 पर्यंत नंतर पूर्वाषाढा.
  • चंद्र राशी –  धनु.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- पांढरा)

आज काही नकारात्मक विचार तुमच्या मनात येतील. महत्त्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या. वैवाहिक जीवनात ही जोडीदाराशी हातचे राखूनच बोला.

वृषभ – ( शुभ रंग -डाळिंबी)

तुमचे मनोबल उत्तम राहील तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर थोडी अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दुपारपूर्वी उरकून घ्या.

मिथुन – (शुभ रंग- तांबडा)

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह राहील.  खर्च वाढत असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

कर्क – ( शुभ रंग- गुलाबी)

नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. घरी पत्नीचेही मूड सांभाळाल. आज तब्येत जरा नाजुकच असेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

_MPC_DIR_MPU_II

सिंह – ( शुभ रंग- सोनेरी)

कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. आज आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष द्याल. प्रेमवीरांना वेळेचे भान राहणार नाही. कार्यक्षेत्रात विरोधक माघार घेतील.

कन्या – ( शुभ रंग-आकाशी)

कौटुंबिक काही वाद असतील तर दुपारनंतर ते सुसंवादाने मिटतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

तूळ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्त्वाची मेल्स येणार आहेत दुपारनंतर प्रवासास निघावे लागेल. गृहिणींचा शेजारी सलोखा वाढेल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

वृश्चिक – ( शुभ रंग- मोरपंखी)

आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील.
आज खिशात पैसा खेळता असल्याने अनेक अवघड कामे सोपी होतील.

धनु – ( शुभ रंग – मरून)

आपले म्हणणे इतरांना पटायलाच हवे असा अट्टाहास करून चालणार नाही. इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. एखादी गहाळ झालेली वस्तू पुन्हा शोधलीत सापडेल.

मकर – (शुभ रंग- मोतीया)

विविध मार्गाने आलेला पैसा आज विविध मार्गाने जाईल. आज गरजूंच्या मदतीला धावून जाल.
वडीलधार्‍या मंडळींशी वैचारिक मतभेद होतील. त्यांच्या वयाच्या मान राखाल.

कुंभ – ( शुभ रंग- राखाडी)

तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी व्यवसाय वाढीच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. काही भाग्यवंतांना नव्या घराचा ताबा मिळेल.

मीन – ( शुभ रंग- जांभळा)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा जोर कमी झाल्याचे जाणवेल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. ध्येयाकडे यशस्वी वाटचाल कराल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment