Today’s Horoscope 01 October 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 01 October 2022
शनिवार.
तारीख 01.10.2022
शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.
दिशा शूल- पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- ज्येष्ठा.
चंद्र राशी- वृश्चिक.
————————————–
मेष – शुभ रंग- मरून
आज नशिबाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. कोणतीही धाडसाची कामे आज टाळा.

वृषभ- शुभ रंग- तांबडा
हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतात. समोरची व्यक्ती कदाचित आपल्यापेक्षाही हुशार असू शकेल याचे भान ठेवा. पत्नीने दिलेले सल्ले उपयुक्त ठरणार आहेत. वाद टाळा संवाद साधा.

मिथुन- शुभ रंग- हिरवा – Today’s Horoscope 01 October 2022
कार्यक्षेत्रात विरोधकांना चहा पाजूनच आपला कार्यभाग साधून घ्यावा लागेल. पत्नी जे म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे व्हा. आरोग्य विषयक तक्रारींची वेळीच दखल घ्या. तरुणांनी व्यसनांपासून लांब राहावे.

कर्क- शुभ रंग- लाल
धंद्यातील काही येणे अनपेक्षित रित्या वसूल होईल. तरुणाईचा जीवाची मुंबई करण्याकडे कल असेल. प्रेम प्रकरणांना थोरांकडून ग्रीन सिग्नल मिळेल. प्रकृती धडधाकट राहील.

सिंह -शुभ रंग- डाळिंबी
हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज मनसोक्तपणे स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. नवोदित कलाकार मंडळींच्या प्रयत्नांना यश येईल. गृहिणी सणासुदीच्या दृष्टीने खरेदीचा श्री गणेशा करतील.

कन्या- शुभ रंग- क्रीम
कामावर दांडी मारून आज घरी मस्त आराम करायचा तुमचा मूड असेल. आज काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणं आवश्यक असणार आहे. गृहिणी मुलांच्या अभ्यासात लक्ष देतील.

तूळ- शुभरंग- पिस्ता
शेजाऱ्यांशी झालेले गैरसमज दूर होऊन संवाद वाढेल. काही जणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. आज घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम असलेला बरा.

वृश्चिक- शुभ रंग- स्ट्रॉबेरी
खर्च कितीही वाढला तरी पैसा कमी पडणार नाही आज काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पायधुळ झाडतील. वक्त्यांच्या भाषणांचा जनमानसांवर प्रभाव पडेल.

Pimpri Chinchwad Police : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या एकूण 136 पोलीस अंमलदारांची पदोन्नती झाल्याने सत्कार

धनु- शुभ रंग-केशरी
जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवायचा तुमचा आज प्रयत्न राहील. अति उत्साहात घेतलेले तुमचे निर्णय चुकू शकतील. बेरोजगार मंडळींना घरापासून लांब दूरवर नोकरीचे प्रस्ताव येतील.

मकर- शुभरंग- राखाडी
आज मौज मजा करण्याचा दिवस. एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. मित्रमंडळी, आप्त स्वकीय आज तुमच्या प्रभावात असतील. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

कुंभ- शुभरंग- पांढरा
कोणतीही गोष्ट आज जिद्दीने पूर्ण कराल. आज कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडू शकेल. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. नोकरीत वरिष्ठांकडून शाब्बासकीची थाप मिळेल.

मीन- शुभरंग- गुलाबी
आज ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असेल. कामाच्या व्यापात काही घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल आज अतिव्यस्त दिवस.

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.