Today’s Horoscope 02 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 02 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख – 02.04.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – कालाष्टमी.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेला असेल.

आज नक्षत्र – पूर्वा शाढा 22.49 पर्यंत. 

चंद्र राशी – धनु.

—————————–

मेष ( शुभ रंग- पिस्ता)

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद हिताचा राहील.

वृषभ (शुभ रंग- लाल)

कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठांचे काहीही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज जोडीदारास दिलेला शब्द पाळा.

मिथुन (शुभ रंग – पांढरा)

केवळ मोठेपणासाठी ऋण काढून सण साजरे करू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न आज करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची ही गरज आहे. तब्येतीला जपा.

कर्क ( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारीने त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. शब्द मात्र जपून वापरा.

सिंह ( शुभ रंग- क्रीम)

दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील.

कन्या (शुभ रंग- डाळिंबी)

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी मनसोक्त खर्च करतील. गृहिणी घर सजावटीचे मनावर घेतील. कलाकारांना तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे.

तूळ (शुभ रंग- मरून)

वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींसाठी आज अति व्यस्त दिवस आहे. मुले आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.

वृश्चिक ( शुभ रंग- राखाडी)

आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज दुरावलेली काही नाती जवळ येतील.

धनु (शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलण्याने नात्यात गैरसमज होतील. कुणालाही मागितल्याशिवाय सर्व देऊ नका.

मकर (शुभ रंग- केशरी)

काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे घरात थोरांच्या शब्दाला मान द्यावा लागेल. आज एखादी महत्त्वाची वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.

कुंभ ( शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आज आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह जाणवेल. रात्रीच्या प्रवासात मात्र बेसावध राहू नका.

मीन (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आळस झटकून कामाला लागाल. पण आज भावनेच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. आज हाती असलेला पैसा जपून वापरा. सरकारी नियम काटेकोरपणे पाळा.

 शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.