Today’s Horoscope 02 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार    बुधवार. ….. ​दि​.  02 डिसेंबर 2020

  • शुभाशुभ विचार –उत्तम दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – दुपारी १२.००  ते ०१.३०.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मृग १०.३८ पर्यंत नंतर आद्रा.
  • चंद्र राशी –  मिथुन.

आजचे राशीभविष्य

मेष( शुभ रंग -पिस्ता )

व्यवसायात नवीन हितसंबंध तयार होतील. नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धीसाठी काही संधी चालून येतील. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सतर्क राहायला हवे.

वृषभ – ( शुभ रंग -राखाडी )

विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचुक ठरतील. लेखक व कवींच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल. बेरोजगारांची वणवण थांबेल.

मिथुन ( शुभ रंग -पांढरा )

आज अत्यंत उत्साहवर्धक दिवस असून नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या गुणांची दखल घेतील. वाढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात मात्र खोळंबा होईल.

कर्क –  ( शुभ रंग- जांभळा )

आज भावना व कर्तव्य या तुमच्या मनाची ओढाताण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील काही अटीतटीचे प्रसंग आज चतुराईने सोडवावे लागतील. हाती असलेले पैसे जपूनच वापरा.

_MPC_DIR_MPU_II

सिंह – ( शुभ रंग- क्रीम )

मित्र आज दिलेली आश्वासने नक्की पाळतील. क्षुल्लक कारणाने दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. हाती असलेले पैसे जपूनच वापरा. संध्याकाळी एखादा अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या ( शुभ रंग – निळा )

उच्चशिक्षित मंडळींना विदेश गमनाचे वेध लागतील. महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र आज द्विधा मनस्थिती होणार आहे. घरातील थोरांचे सल्ले अवश्य घ्या. त्यांच्या वयाचा मान राखा.

तूळ –  ( शुभ रंग – गुलाबी )

 कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडू शकतील. अशावेळी मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे आहे. आज तुम्ही गरजूंना मदत करणार आहात. आपल्याही मिळकतीचा अंदाज घ्या.

वृश्चिक – ( शुभ रंग- मोतिया)

आज व्यवसायात महत्त्वाचे करार मदार यशस्वी होतील. वादविवादात आपल्याच मतावर अडून राहू शकाल. जोडीदाराच्या भावना जपण्याचा आज प्रयत्न कराल.

धनु  ( शुभ रंग- सोनेरी)

आज नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम कराल. वाढीव जबाबदाऱ्या सकारात्मकतेने स्वीकाराल. आज तुम्ही घाईगर्दीत घेतलेला एखादा निर्णय चुकण्याची शक्यता आहे.

मकर – (शुभ रंग – भगवा)

आज तुम्हाला मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यांच्या शिस्तिस प्राधान्य देणे गरजेचे आहे. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

कुंभ – ( शुभ रंग – डाळिंबी )

स्थावर इस्टेटी विषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडतील. नवे परिचय होतील. आज घर सजावटीसाठी मौल्यवान खरेदी कराल.

मीन (  शुभ रंग – केशरी)

महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. आज आनंदाच्या भरात कुणाला ही वचने देऊ नका ती पाळता येणार नाही. मुलांचा अभ्यासात आनंदी आनंद असेल.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.