Today’s Horoscope 02 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 02 December 2022
वार – शुक्रवार.
02.12.2022.
शुभाशुभ विचार- शुभ दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा.
चंद्र राशी – मीन.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- सोनेरी )
आज घरात थोरा मोठ्यांशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतील. आज तुम्ही गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल, मात्र वाद टाळा. आजचा दिवस खर्चाचा आहे बचतीचा विचार सोडून द्या.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )
आज तुम्ही जे जे चिंताल ते ते होईल. कदाचित तुमच्या पात्रतेपेक्षा काहीतरी जास्तच तुमच्या पदरात पडेल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून आज फक्त शुभ बोला आणि शुभ चिंता.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्यायला हवी कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न मात्र दुर्लक्षित होतील कदाचित तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी ही पत्करावी लागू शकते.

कर्क (शुभ रंग- भगवा)
आज तुमच्या मागे दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. सज्जनांचा सहवास लाभेल घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.

सिंह (शुभ रंग- नारिंगी )
आज कोणतीही धाडसाची कामे करू नका. स्वतःला जपा, आज कोणावरही डोळे झाकून विश्वासही ठेवू नका कारण विश्वासातील व्यक्तींकडूनच विश्वासघात होऊ शकतो.

कन्या ( शुभ रंग- केशरी )
आज कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असेल त्यामुळे तुम्ही कार्यक्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा चांगल्या प्रकारे उमटवू शकाल. कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटण्याजोगे कर्तृत्व कराल.

तूळ ( शुभ रंग- निळा)
कोणतीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (शुभ रंग-लाल)
हौशी मंडळी जीवाची मुंबई करतील आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा व वेळ ही खर्च कराल. गूढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येऊ शकेल.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी) – Today’s Horoscope 02 December 2022
बरेच काळ पासून रखडत असलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालावे लागणार आहे. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत वाढेल. आज मुलांच्या अभ्यासात डोकवणे गरजेचे वाटेल.

मकर ( शुभ रंग- मोतिया )
आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चालढकलच करतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा अजिबात करू नये.

कुंभ (शुभ रंग – गुलाबी)
आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा. गृहिणींना काही प्रिय पाहुण्यांची उठबस आज करावी लागणार आहे.

मीन -(शुभ रंग – राखाडी )
आज स्वतःचेच खरे करू नका, इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून सावधच रहा.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pune Fire News : मित्र मंडळ चौकजवळ एका विद्युत ट्रान्सफॉर्मरला लागली आग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.