Today’s Horoscope 02 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  मंगळवार, ​दि​. 02 फेब्रुवारी 2021

 

  • शुभाशुभ विचार -चांगला दिवस.
  • आज विशेष -साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी ०३.०० ते ४.३०.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – हस्त २२.३२ पर्यंत नंतर चित्रा.
  • चंद्र राशी –  कन्या.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – लाल)
कार्यक्षेत्रात विरोधकांच्या कारवाया वाढलेल्या आहेत. बेरोजगारांच्या भटकंतीस येईल. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील. नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार नकोत.

वृषभ – (शुभ रंग – क्रीम)
काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. मित्रांमध्ये आपला बडेजाव दाखवण्यासाठी तुम्ही खर्च कराल.

मिथुन – (शुभ रंग- पिस्ता)
आज जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. भावंडात प्रेम राहील. गृहिणी स्वतःच्या आवडीस प्राधान्य देतील. सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.

कर्क – (शुभ रंग – मरून)
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे असे काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा आज कल राहील. आज जमाखर्चाचा मेळ घालणे जरासे अवघड जाईल.

सिंह – (शुभ रंग – सोनेरी)
आज काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्यउत्साह वाढेल कार्यक्षेत्रात विरोधकांनाही तुमची मते पटू लागतील. चांगले हितसंबंध निर्माण होतील. पुरेशी बचतही करता येईल.

_MPC_DIR_MPU_II
कन्या – (शुभ रंग – हिरवा)
आज तुम्ही स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्याकडून घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील, स्वतःवर थोडा संयम ठेवा. इतरांचेही ऐकून घ्यायची तयारी ठेवा.

तूळ – (शुभ रंग – डाळिंबी)
आज कार्यक्षेत्रात काही पेच प्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल. आर्थिक धाडस मात्र मर्यादेबाहेर करू नका. भक्तीमार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल. 

वृश्चिक – (शुभ रंग – राखाडी)
व्यवसायात उत्तम यश मिळून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकाल. यशाकडेच तुमची वाटचाल चालू आहे. आज अकस्मिक धन लाभाची शक्यता आहे.

धनु – (शुभ रंग – निळा)
आज आत्मविश्वास व स्वावलंबन गरजेचे आहे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. योग्यवेळी अधिकारांचा वापर कराल. इच्छित ध्येय साध्य होतील 

मकर – (शुभ रंग – मोरपंखी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या शाब्बासकीस बळी जाऊ नका. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्वासनेही फार मनावर घेऊ नका. भक्तिमार्गात उपासकांना एखादी परिस्थिती येईल.

कुंभ – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्यामागे लागू नका. कर्ज प्रस्ताव रखडणार आहेत. आज कोणत्याही स्वरूपाची रिस्क घेऊ नका.

मीन –  (शुभ रंग – गुलाबी)
आज कोणत्याही क्षेत्रात तीव्र स्पर्धा अटळच आहे. खेळाडूंना अटीतटीची झुंज द्यावी लागणार आहे. वैवाहिक जीवनात फक्त तू म्हणशील तसं म्हटल्याने बरेचसे प्रश्न सुटतील.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.