Today’s Horoscope 02 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 02 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – गुरूवार.

02-02-2023

शुभाशुभ विचार – 12 नंतर चांगला दिवस.

आज विशेष- भीष्म द्वादशी.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र- आद्रा.

चंद्र राशी – मिथुन.

—————————–

आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- पांढरा )

आजचा तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. आज झालेल्या काही नव्या ओळखी व्यवसाय वृद्धीसाठी फायदेशीर ठरतील. आज लहान भावास मदत करावी लागेल.

वृषभ (शुभ रंग- तांबडा )

आज तुमची काही येणी असतील तर ती अनपेक्षित पणे वसूल होतील. वक्ते व्यासपीठ गाजवतील. घरी हवे हवे असे वाटणारे पाहुणे येतील. आज प्रवासाची दगदग टाळलेली बरी.

मिथुन ( शुभ रंग- जांभळा )

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. इतरांना झोपणारी कामे सहजच पूर्ण कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा.

कर्क (शुभ रंग- सोनेरी )

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. एकाच्या भरोशावर दुसऱ्यास शब्द देऊ नका. काही फसव्या संधी येतील. प्रलोभनांपासून दूरच रहा खर्चात कपात गरजेची.

सिंह (शुभ रंग- क्रीम )

नोकरीच्या ठिकाणी काही उत्साह पूर्ण घटना घडतील. वरिष्ठ तुमची मते ऐकून घेतील. अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा. आज वाहतुकीचे नियम पाळायला हवेत.

कन्या ( शुभ रंग- लाल )

नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आज वडिलांचे सल्ले विचारात घ्या.

Sambhaji Bhide : ‘समुद्रात महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका’

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. पण तसे करू नका प्रलोभने टाळा. संयम ठेवा.

वृश्चिक (शुभ रंग- पिस्ता )

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज जेष्ठ मंडळींना सत्संगातून मनःशांती मिळेल.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.

मकर ( शुभ रंग- राखाडी )

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर नीवळतील.

कुंभ (शुभ रंग – गुलाबी )

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. आज काही बिकट प्रश्न सहज सुटू शकतील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल. उत्साह पूर्ण दिवस.

मीन -(शुभ रंग – निळा )

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. शेअर्स व्यवहारात तुमचे अंदाज खरे ठरतील. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहाल आज मातोश्रींकडून लाभ होईल.

 

 शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क *9689165424*

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.