Today’s Horoscope 02 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 02 June 2023
वार – शुक्रवार
02.06.2023
शुभाशुभ विचार- 07 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – स्वाती 6.53 पर्यंत नंतर विशाखा.
चंद्र राशी – तुळ.
—————————————-
मेष ( शुभ रंग- डाळिंबी )
आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात आपल्या जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हाऊस मौज करताना कायद्याचे भान ठेवा. शब्दांचा वापर मात्र जपूनच करा.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर अंकुश गरजेचा आहे.

मिथुन ( शुभ रंग- मरून )
आज तुमचा मौज मजा करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज चांगले चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

कर्क (शुभ रंग- गुलाबी )
स्थावर शेतीवाडी संबंधित काही अपुरे व्यवहार असतील तर ते मार्गी लागू शकतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. गृहिणींना आज माहेरीची ओढ लागेल.

सिंह (शुभ रंग- भगवा )
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. घराबाहेर वाद संभवतात.

कन्या ( शुभ रंग- राखाडी ) – Today’s Horoscope 02 June 2023
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. आज आनंदी दिवस आहे.

तूळ ( शुभ रंग- हिरवा )
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील उपवारांना स्थळे सांगून येतील आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा वेळ खर्च कराल इतरांच्या भानगडीत मध्यस्थी कराल.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम)
खर्चाचे प्रमाण कितीही वाढले तरी पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.

धनु (शुभ रंग- पांढरा)
पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा पदरात पडेल. तुमचे कष्ट कारणी लागतील व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा आहे.

मकर ( शुभ रंग- पिस्ता )
नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करायची आज तुमची तयारी असेल.

कुंभ (शुभ रंग – आकाशी )
आज उद्योग धंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस असून नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. कार्यक्षेत्रात काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मीन -(शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
आज फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करा. भावनेच्या आहारी जाऊन कोणालाही वचने देऊ नका जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही गाडी हळू चालवा.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pimpri : शहर पोलीस दलातील सहायक आयुक्त, वरीष्ठ निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.