Today’s Horoscope 02 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – मंगळवार – 02 मार्च 2021

  • शुभाशुभ विचार –उत्तम दिवस.
  • आज विशेष – अंगारक चतुर्थी (चंद्रोदय 21.51)
  • राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30
  • दिशा शूल – उत्तरेस असेल
  • आजचे नक्षत्र – चित्रा
  • चंद्र राशी – कन्या 16.30 पर्यंत नंतर तूळ.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – लाल)

नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. येणी असतील तर वसूल होतील. एखादा शत्रू मित्रांमध्येच  लपलेला असू शकतो सावध राहा. क्रोधावर लगाम ठेवा.

वृषभ – (शुभ रंग – क्रीम)

काही दुरावलेल्या हित संबंधात सुधारणा होईल. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. कलाक्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी मिळतील. सगळी महत्त्वाची कामे आज दुपार पूर्वीच उरका.

मिथुन – (शुभ रंग- पिस्ता )

व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

कर्क – (शुभ रंग – मरून)

आज काही कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागेल. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागतील. आज काही चुकीचे मोह, प्रलोभने तुम्हाला आकर्षित करतील. मनावर ताबा ठेवा.

सिंह – (शुभ रंग – सोनेरी)

काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्य उत्साह वाढेल. उत्पन्नाचे विविध मार्ग खुले होतील. आपले म्हणणे विरोधकांना पटवून द्याल. व्यवसायातील स्पर्धेस तोंड द्यावेच लागेल.

कन्या – (शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्याकडून घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील, तुमचा अहंकार दुखावणारी एखादी घटना घडू शकेल. स्वतःवर थोडा संयम ठेवा.

तूळ – (शुभ रंग – डाळिंबी )

आज कार्यक्षेत्रात काही पेच प्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल. भक्तीमार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल. आज बचतीस प्राधान्य द्याल. दुपारनंतर हरवलेले गवसेल.

वृश्चिक – (शुभ रंग- राखाडी)

नवीन ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. आज काही दुरावलेली नाती जवळ येतील. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल. छान दिवस.

धनु – (शुभ रंग – निळा)

आज नोकरीच्या ठिकाणी वाढीव जबाबदारी आनंदाने स्वीकारून स्वतःचे वर्चस्व सिद्ध कराल. सहकारी मंडळी तुमच्या मताचा आदर करतील. मित्रमंडळींना आज दुरूनच राम-राम.

मकर – (शुभ रंग – मोरपंखी)

आज ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. मोफत सल्लागार बरीच मंडळी भेटतील. आज नास्तिक मंडळीही गरजेपुरती अध्यात्मिक होतील. दिवसाच्या उत्तरार्धातील कामे यशस्वी होतील.

कुंभ – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होइल. कर्ज प्रस्ताव रखडणार आहेत. कार्यक्षेत्रात अंतर्गत राजकारणाचा  सामना करावा लागेल.

मीन – (शुभ रंग – गुलाबी)

कौटुंबिक वातावरण समाधानी असल्याने तुम्ही कार्य क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. योग्य माणसे संपर्कात येतील. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी असेच वातावरण राहील.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.