Today’s Horoscope 02 October 2022 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – रविवार, तारीख 02 ऑक्टोबर 2022 (Today’s Horoscope 02 October 2022)
शुभाशुभ विचार- 19 पर्यंत चांगला दिवस
आज विशेष – महात्मा गांधी जयंती
राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00
दिशा शूल- पश्चिमेस असेल
आजचे नक्षत्र- मूळ
चंद्र राशी- धनु
————————————–

 मेष – (शुभ रंग- जांभळा)

नोकरी धंद्यात तुमच्या मनाविरुद्ध काही घटना घडतील, त्यामुळे तुम्हाला नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा होईल पण तो टाळा. स्वतःवर संयम ठेवा. प्रलोभने टाळा.

वृषभ- (शुभ रंग- तांबडा)

 उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असून मोठे आर्थिक व्यवहार उद्यावर ढकललेले बरे. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनःशांती मिळेल. आज कोणत्याही प्रकारचे धाडस नको.

मिथुन- (शुभ रंग- डाळिंबी) (Today’s Horoscope 02 October 2022)

 सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदारांच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. संध्याकाळी फक्त आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

कर्क- (शुभ रंग- मरून)

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तुमची तब्येत थोडी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.

सिंह -(शुभ रंग- गुलाबी)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची उत्तम साथ राहील. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येणार आहेत नवोदित कलाकारांना ग्लॅमर ची चव चाखता येईल.

कन्या- (शुभ रंग- पांढरा)

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम असाल. स्थावराचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल.

तूळ- (शुभरंग- स्ट्रॉबेरी) (Today’s Horoscope 02 October 2022)

नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. अति आत्मविश्वास ही आज नुकसानास कारणीभूत होऊ शकतो. घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम ठेवा.

वृश्चिक- (शुभ रंग- पिस्ता)

तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकारल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील.

धनु- (शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल इतरांस न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा.

Chandni Chowk Bridge Blast : स्फोटानंतर पोकलेनच्या मदतीने जमीनदोस्त केला चांदणी चौकातील पूल, सकाळपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद

मकर- (शुभरंग- केशरी)

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरोशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. दानधर्म करताना आपली शिल्लक आधी तपासून घ्या. कलाकारांचा दूरवर नावलौकिक होईल.

कुंभ- (शुभरंग- क्रीम)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी आज तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम मोडाल तर दंड चुकणार नाही.

मीन- (शुभरंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येणार आहेत. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. वडील आज योग्य सल्ले देतील.

शुभम भवतु

– जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.