Today’s Horoscope 03 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 03 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख – 03.04.2024.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00  ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेला असेल.

आज नक्षत्र – उत्तराशाढा 21.48 पर्यंत नंतर श्रवण.

चंद्र राशी – मकर.

—————————–
मेष ( शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही भावाने पेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांना वेळ देणे अवघड होईल.

वृषभ (शुभ रंग- हिरवा)

आज देवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. थोरामोठ्यांच्या शब्दाचा मान ठेवाल.

मिथुन (शुभ रंग – पिस्ता)

आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हीतशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. सावध राहा.

कर्क ( शुभ रंग- लाल)

कौटुंबिक वातावरण समंजस्याचे असल्याने तुम्ही कार्यक्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

सिंह ( शुभ रंग- मरून)

कोणतीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती मात्र वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

कन्या (शुभ रंग- राखाडी)

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

तूळ (शुभ रंग- क्रीम)

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे आवश्यक आहे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

वृश्चिक ( शुभ रंग- केशरी)

शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. काहीजणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवा. मुलांनी आईच्या आज्ञेत राहावे.

धनु (शुभ रंग- आकाशी)

वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल. काही येणी असतील तर दिवसाच्या उत्तरार्धात वसूल होऊ शकतील.
मकर (शुभ रंग- डाळिंबी)

आज अति उत्साहाच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवर तरुणांना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. एखाद्या समारंभात आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

कुंभ ( शुभ रंग- चंदेरी)

आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज संध्याकाळी हरवलेले गवसेल.

मीन (शुभ रंग- जांभळा)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कमी श्रमात जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ.

 

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.