_MPC_DIR_MPU_III

Today’s Horoscope 03 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – बुधवार – 03 मार्च 2021

 

_MPC_DIR_MPU_IV
  • शुभाशुभ विचार — उत्तम दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ -दुपारी 12.00 ते 01.30
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – स्वाती नक्षत्र.
  • चंद्र राशी – तूळ.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- क्रीम )

आज सभा-संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न करणार आहात. ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. पत्नी आज महत्त्वपूर्ण सल्ले देईल.

वृषभ – ( शुभ रंग- मरून )

आज फक्त कष्ट करीत राहा. फळाची अपेक्षा मात्र उद्या करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. तब्येतीच्या बाबतीत पैशाची काटकसर करून चालणार नाही.

मिथुन – (शुभ रंग- हिरवा )

कुटुंबीयांमधील प्रेम वृद्धिंगत होईल. मुले आज अभ्यासास प्राधान्य देतील. नवीन कलाकारांची प्रसिद्धी ची हौस भागेल. आरोग्य उत्तम राहील. गृहिणी आज घर सजावटीचे मनावर घेतील.

कर्क – (शुभ रंग – पांढरा )

कोर्टकचेरीची कामे पुढे सरकतील. व्यावसायिक नवे करार यशस्वी होतील. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी मातोश्री योग्य सल्ला देतील. आज परिवारास पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

सिंह –  ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. आज कठोरपणे बोलून कोणाचे मन दुखवू नका. नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम तंतोतंत पाळा.

_MPC_DIR_MPU_II

कन्या –  ( शुभ रंग – पिस्ता )

आज तुम्ही अति धावपळ टाळा. अनेक किचकट कामे आज सोपी होणार आहेत. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील.

तूळ – ( शुभ रंग – मोतिया)

आज तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवणारी काही मंडळी भेटतील. योग्य निर्णय घेणे अवघड जाईल. स्वतःच्या मनावर ताबा असणे हिताचे राहील. काहीजणांना अचानक प्रवासास निघावे लागेल.

वृश्चिक – ( शुभ रंग- सोनेरी )

कंजूष पणा सोडून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील. कर्ज हप्ते भरावे लागणार आहेत. खर्च वाढता असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. दुरावलेल्या नात्यांमधील गैरसमज दूर होतील.

धनु – (शुभ रंग -आकाशी )

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहिल. आज काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पायधूळ  झाडतील. प्रतिष्ठितांच्या ओळखी आज कामी येतील. आज एखाद्या मित्रांस मदत कराल.

मकर – ( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामातही अडथळे येणार आहेत. आज नोकरदारांना जास्त वेळ थांबून काम उरकावे लागेल. आज हट्टीपणा सोडून इतरांचेही विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. अधिकाराचा गैरवापर टाळा.

कुंभ – ( शुभ रंग – लाल )

आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. उद्योग-धंद्यात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या लोकांमध्ये मिळून-मिसळून राहणे गरजेचे.

मीन – ( शुभ रंग – क्रीम )

 कार्यक्षेत्रात हितशत्रू सक्रिय असल्याने आज प्रत्येक निर्णय विचारांती घ्यावा. देण्याघेण्याचे व्यवहार सावधपणे करावेत. नोकरदारांना ऑफिसमध्ये साहेबांचे व घरात पत्नीचेही मूड सांभाळावे लागतील.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.