Today’s Horoscope 03 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – सोमवार. 03 मे  2021

  • शुभाशुभ विचार — उत्तम दिवस.
  • आज विशेष – कालाष्टमी.
  • राहू काळ – सकाळी 7.30  ते 9.00
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तराषाढा 08.22 पर्यंत, नंतर श्रवण.
  • चंद्र राशी –  मकर.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – गुलाबी )

आज तुमच्यासाठी संमिश्र फळे देणारा दिवस असेल. तुमचा नोकरी व्यवसायातील मानसन्मान वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. विरोधकांचा विरोध कमी होईल.

वृषभ – ( शुभ रंग – डाळिंबी)

आज आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. रिकामटेकड्या मित्रमंडळींना दुरूनच राम-राम करणे हिताचे. ज्येष्ठ मंडळींना उपासनेची प्रचिती येईल. सरकारी कामात विलंब होईल.

मिथुन – ( शुभ रंग – मरून)

नवीन झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज काही गोड बोली माणसे भेटतील झटपट लाभाचा मोह टाळा. आज पत्नीच्या हो ला हो करून विषय संपवा.

कर्क – ( शुभ रंग – सोनेरी)

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्वाचा चांगला प्रभाव राहील. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा आवर्जून प्रयत्न कराल. व्यवसायात अनेक आकर्षक संधी चालून येतील.

सिंह – (शुभ रंग- पांढरा)

आज अती धावपळ टाळा, हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर करण्यास प्राधान्य द्या. येणारी एकही संधी वाया घालवू नका. ज्येष्ठांना आज काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील.

कन्या – ( शुभ रंग – मोतीया)

कौटुंबिक अडचणी आज वडीलधाऱ्यांच्या मदतीने सुटतील. महत्त्वाचे निर्णय घेताना तुमची द्विधा मनस्थिती होणार आहे. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना वाव मिळेल.

तूळ –  ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रातील तुमच्या पूर्वीच्या कष्टांचे चीज होईल. यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे फारच मनावर घेतील.

वृश्चिक –( शुभ रंग आकाशी)

उद्योगधंद्यातील महत्त्वपूर्ण करारमदार दुपारपूर्वी उरकून घ्या. नंतर दिवस तितकासा अनुकूल नाही संध्याकाळी वाहन चालवताना सतर्क राहा. शेजाऱ्यांशी सलोखा राहील.

धनु – ( शुभ रंग- भगवा)

वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. वास्तू व वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल. तुमच्या खिशात पैसा खेळता राहील. कौटुंबिक स्तरावर आनंदी घटना घडतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

मकर – (शुभ रंग- डाळिंबी)

प्रत्येक गोष्ट आपल्याच मनाप्रमाणे व्हावी असा तुमचा अट्टाहास असेल. तरुणांनी मौजमजा करतांना मर्यादांचे उल्लंघन करू नये. उद्धटपणास लगाम गरजेचा आहे.

कुंभ – (शुभ रंग – क्रीम)

नोकरी-व्यवसायात व्यस्तता वाढेल. पारिवारिक सदस्यांच्या गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. गृहिणींना मुलांच्या शिस्तिकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

मीन – ( शुभ रंग – पिस्ता )

व्यावसायिक अडचणी कमी होतील. आधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल असेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल.  विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.