Today’s Horoscope 03 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग… शनिवार, दिनांक… 03 ऑक्टोबर 2020

  • शुभाशुभ…सामान्य दिवस
  • आज विशेष .. सामान्य दिवस.
  • राहूकाळ.. सकाळी 09.00 ते 10.30.
  • दिशा शूल… पूर्वेस असेल.
  • नक्षत्र… रेवती 08.51 पर्यंत नंतर अश्विनी
  • आजची चंद्र राशी… मीन 08.51 पर्यंत नंतर मेष.

आजचे राशीभविष्य

मेष -( शुभ रंग- राखाडी)

आज तुमचे मन चंचल राहील योग्य निर्णय घेण्यास विलंब होईल. कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. अति सडेतोडपणा मुळे काही आपलीच माणसे नाराज होतील.


वृषभ – (शुभ रंग -भगवा)

आज पैसा येण्या इतकेच जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणेही गरजेचे आहे कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते, सावध रहा.

मिथुन – ( शुभ रंग -हिरवा)

योग्य वेळी घेतलेल्या अचूक निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक पुरेशी असल्याने पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावता येतील. मित्रमंडळीत मोठेपणा मिळेल.

कर्क  – ( शुभ रंग -मोतिया)

आज नाकासमोरच चालणे हिताचे राहील बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात मित्रांच्या फार नादी लागू नका. आज आपल्या मर्यादेत राहिलेले बरे.

.

सिंह – (शुभरंग -स्ट्रॉबेरी)

आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठांच्या फार मागेपुढे करू नका.

कन्या – (शुभ रंग -तांबडा)

भागीदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. आज कोणतीही रिस्क नकोच.

तूळ – ( शुभरंग -मोरपंखी)

आज तुम्हाला काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. अनेक किचकट कामे सोपी होतील.

 

वृश्चिक – ( शुभ रंग- मरून )

आज तुमचा कामातील उत्साह दांडगा असेल. काही कामे आज निस्वार्थीपणे कराल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की मिळेल.

तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका.

 

धनु – ( शुभ रंग- आकाशी)

आज तुम्ही कामावर दांडी मारून थोडं करमणुकीस प्राधान्य द्याल. गृहिणी संध्याकाळी मॉलमध्ये फेरफटका मारतील. प्रेम प्रकरणांना घरातील मोठ्यांकडून ग्रीन सिग्नल मिळेल.

मकर  – (शुभ रंग- गुलाबी)

आज तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात भाग घ्याल. कुटुंबियांना अभिमान वाटेल अशी एखादी कामगिरी तुमच्या हातून घडेल. आज गृहिणींना उसंत मिळणं कठीणच जाईल.


कुंभ
– ( शुभ रंग पांढरा)

आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीची कामे रखडणार आहेत. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवणे गरजेचे आहे.

मीन – ( शुभ रंग -नारिंगी)

राशीच्या धनस्थानात प्रवेश करणारा चंद्र काही अनपेक्षित धन मिळवून देईल. कार्यक्षेत्रात तुमची उन्नत्तीकडें  वाटचाल सुरू होईल. प्रवासात आरोग्य सांभाळा
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.