Today’s Horoscope 03 October 2022 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 03 October 2022
सोमवार.
तारीख 03.10.2022
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष – दुर्गाष्टमी.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
दिशा शूल- पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- पूर्वाशाढा.
चंद्र राशी- धनु.
————————————–
मेष – शुभ रंग- डाळिंबी

आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. आज नास्तिक असाल तरी देवाला एखाद्या नवस बोलाल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. दैवाची उत्तम साथ राहील.

वृषभ- शुभ रंग- मरून

व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने नवीन व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ मिळेल. कुटुंबास आज पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

मिथुन- शुभ रंग- जांभळा – Today’s Horoscope 03 October 2022

धंद्यातील येणी वसूल झाल्याने व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. कार्यक्षेत्रात गोड बोलून आपला स्वार्थ साधाल. जुनी दुखणी अंगावर काढू नका आज तुम्हाला विश्रांतीची गरज आहे.

कर्क- शुभ रंग- तांबडा

कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतोय.

सिंह -शुभ रंग- गुलाबी

कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना आज तुम्हाला नाकी नऊ येतील. मुले अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची ऊठबस आगत्याने करतील.

कन्या- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूस आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येणार आहेत.

तूळ- शुभ रंग- पांढरा

आवक पुरेशी असल्याने तुम्हाला मनासारखा खर्च करता येईल. क्षुल्लक कारणावरून शेजारी आज रुसून बसतील. आज जरा स्पष्ट वक्तेपणास आवर घालायला हवा, अन्यथा काही नाती दुरावतील.

वृश्चिक- शुभ रंग- पिस्ता

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. आज हातचे सोडून पळत्या मागे धावावेसे वाटेल.

धनु- शुभ रंग- केशरी

एखादी हरवलेली वस्तू पुन्हा शोधल्यास सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल. घरात मोठ्यांच्या हो ला हो करा. वाद वाढवू नका

मकर- शुभ रंग- केशरी

महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. अधिकारी वर्गास परदेश दौरे घडतील. हातचे सोडून पळत्या मागे धावणार आहात.

कुंभ- शुभ रंग- निळा

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होतील.

मीन- शुभ रंग- क्रीम

काही मनाविरुद्ध घटनांनी नैराश्य येईल. कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. वैवाहिक जीवनात काही सौम्य मतभेद होतील.

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.