Today’s Horoscope 04 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 04 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – गुरुवार.

तारीख – 04.04.2024.

शुभाशुभ विचार – 16 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 01.30  ते  3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – श्रवण 20.12 पर्यंत नंतर धनिष्ठा.

चंद्र राशी – मकर.

—————————–

मेष ( शुभ रंग- निळा)

आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे करू शकाल. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील. आज विरोधकांनाही तुमचे विचार पटवून देऊ शकाल.

वृषभ (शुभ रंग- पांढरा)

नोकरी धंद्याच्या ठिकाणी काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. पण आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. संयम ठेवा. ज्येष्ठांना उपासनेची प्रचिती येईल.

मिथुन (शुभ रंग – क्रीम)

आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असून मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनःशांती मिळेल. आज कोणतेही धाडस नको.

कर्क ( शुभ रंग- पांढरा)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. संध्याकाळी जोडीदाराला वेळ देणे हिताचे राहील.

सिंह ( शुभ रंग- आकाशी)

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तब्येत थोडी नरमच असेल. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.

कन्या (शुभ रंग- मरून)

तुमच्या प्रामाणिक मेहेनतीस नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

तूळ (शुभ रंग- केशरी)

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहाल. स्थावराचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहावे.

वृश्चिक ( शुभ रंग- डाळिंबी)

ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. अति आत्मविश्वास ही नुकसानाला कारणीभूत ठरेल. अति हुशार मंडळी आज भेटणार आहेत. कमीच बोललेले बरे.

धनु (शुभ रंग- सोनेरी)

कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पाहुण्यांची उठबस गृहिणी आनंदाने करतील.

मकर (शुभ रंग- चंदेरी)

कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दाला मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत तुम्ही लक्ष घालाल. प्रवासात खोळंबा संभवतो.

कुंभ ( शुभ रंग- जांभळा)

आर्थिक व्यवहारात सावध असायला हवे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. रात्रीच्या प्रवासात सावध राहा. आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.

मीन (शुभ रंग- भगवा)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज नमतेच घेतील. संततीकडून महत्त्वाचे समाचार येतील.

 शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.