Today’s Horoscope 04 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 04 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 04.12.2023.

शुभाशुभ विचार – वैधृती वर्ज्य. 

आज विशेष – सामान्य दिवस

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – मघा 24.35 पर्यंत नंतर पूर्व फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.

—————————–

मेष – ( शुभ रंग – पिस्ता)

कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकी नऊ येतील. मुले अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची उठबस हसत मुखाने करतील.

वृषभ –  ( शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्ही गरजूंना आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज काही शुभ समाचार येतील.

मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)

आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. किरकोळ कारणांवरून शेजारी रुसून बसतील. आज जरा अति स्पष्ट वक्तेपणास आवर घालायला हवा अन्यथा नाती दुरावतील.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही काहीसे लहरीपणा ने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारीच नसेल. उतावीळ पणाने घेतलेले काही निर्णय चुकू शकतात. हातचे सोडून पळत्या मागे धावू नका.

सिंह – ( शुभ रंग – निळा)

एखादी हरवलेली वस्तू परत सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल. घरात थोरामोठ्यांच्या होला हो करा वाद वाढवू नका.

कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)

महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. अधिकारी वर्गाला विदेश दौरे घडतील. हातचे सोडून मृगजळा मागे धावण्याचा मोह होईल.

तूळ –  ( शुभ रंग- गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होतील.

वृश्चिक –  ( शुभ रंग – आकाशी)

काही मनाविरुद्ध घटनांनी नैराश्य येईल. कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. वैवाहिक जीवनात आज काही सौम्य मतभेद होतील.

धनु –  (शुभ रंग- केशरी)

आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल. नास्तिकही आज देवाला एखादा नवस बोलतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत योजाल. दैवाची साथ राहील.

मकर-  (शुभ रंग- जांभळा)

व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला पत्नीची खंबीर साथ असेल. कुटुंबास पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

कुंभ – (शुभ रंग- क्रीम)

धंद्यातील येणी वसूल होतील. गोड गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपलेसे कराल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. आज विश्रांतीही आवश्यक आहे.

मीन – ( शुभ रंग- डाळिंबी)

कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो आहे.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.