Today’s Horoscope 04 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  गुरुवार. …. ​दि​.  04 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार – 20 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – कालाष्टमी.
  • राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – स्वाती नक्षत्र 19.45 पर्यंत नंतर विशाखा.
  • चंद्र राशी – तूळ.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- क्रीम )
नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. कामाच्या व्यापात स्वतःच्या आवडी निवडी दुर्लक्षित होतील. ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. रिकामटेकड्या गप्पांतून फक्त वाद होतील.

वृषभ – ( शुभ रंग- मरून )
नवीन ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. काही मानापमानाच्या प्रसंगांना आज तोंड द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळेल. रुग्णांनी पथ्य पाळणे गरजेचे.

.

मिथुन –  (शुभ रंग- हिरवा )
आज तुम्ही स्वतःच्या आवडीस आधी प्राधान्य द्याल. चैन करण्यासाठी पुरेसा पैसा जवळ असेल. कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील.  रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.

कर्क – (शुभ रंग – पांढरा )
वास्तू वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. आज आईच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. कलेच्या क्षेत्रात असणाऱ्यांना स्ट्रगल वाढवावी लागेल.

सिंह – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. कामाच्या व्यापात कुटुंबीयांना वेळ देणे अशक्य होईल. प्रॉपर्टी खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळलेलेच बरे.

कन्या – ( शुभ रंग – पिस्ता )
आर्थिक बाजू भक्कम राहील. मोठी खरेदी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपली बाजू प्रभावीपणे मांडाल. पत्नी आज योग्य तेच सल्ले देणार आहे. शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील.

तूळ – ( शुभ रंग – मोतिया)
अतिउत्साहाच्या भरात काही चुकीचे निर्णय घ्याल. हाती असलेला पैसा जपून वापरा कोणालाही शब्द देऊ नका. जोडीदाराला दिलेला शब्द मात्र आज जरूर पळणेच हिताचे.

वृश्चिक – ( शुभ रंग- सोनेरी )
काम सोडून आज काही निरर्थक वादात वेळ खर्च होण्याची शक्यता आहे. खर्च वाढता असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. दूरच्या प्रवासात झोपून चालणार नाही.

धनु – (शुभ रंग -आकाशी )
दुरावलेले नातलग एकत्र येथील. मित्र दिलेली आश्वासने पूर्ण करतील. नव्या योजना वेग घेतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस. आज एखाद्या मित्रांस मदत कराल.

मकर – ( शुभ रंग- निळा )
भावना आणि कर्तव्य यांचा योग्य समन्वय साधावा लागेल. आज नोकरदारांना जास्त वेळ थांबून काम करावे लागेल. कामाच्या ठिकाणी हितशत्रू तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील.

कुंभ – ( शुभ रंग – लाल )
आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. अधिकारी वर्गास हाताखालच्या लोकांची नाराजी पत्करावी लागेल. शासकीय कामे रखडणार आहेत.

मीन – ( शुभ रंग – क्रीम )
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. भिडस्तपणाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या मात्र स्वीकारू नका. अति कष्ट तब्येत बिघडण्यास कारणीभूत होतील. विश्रांती ही गरजेची असते.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.