Today’s Horoscope 04 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – मंगळवार, दि. 04 मे  2021

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस..
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – श्रवण 08.26 पर्यंत नंतर धनिष्ठा.
  • चंद्र राशी –  मकर 02.43 पर्यंत नंतर कुंभ..

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – डाळिंबी)
नोकरीच्या ठिकाणी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्या. नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. विरोधक तुमच्या चुका शोधत आहेत. स्वावलंबनाने अनेक कामे सोपी होतील.

वृषभ –
नोकरीत वरिष्ठांना काही सुचवायचे असेल तर आज दिवस योग्य नाही. आज फक्त कष्ट करीत राहा. फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. ज्येष्ठ उपासनेत मन रमवतिल.

मिथुन –
नवीन झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज काही गोड बोली माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे राहील. आज कामापुरतेच बोला व वाद टाळा.

कर्क – (शुभ रंग – हिरवा)
आज सभा-संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. एखादे लग्न जुळवण्यासाठी आज तुम्ही यशस्वी मध्यस्थी कराल.

_MPC_DIR_MPU_II

सिंह – (शुभ रंग- पांढरा)
नोकरीत आज तुम्हाला काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. कितीही राबलात तरीही वरिष्ठांचे समाधान होणे अशक्य. आज तुम्हाला थोडा शारीरिक थकवा जाणवेल.

कन्या – (शुभ रंग – पिस्ता)
आज तुम्ही कर्तव्यापेक्षा मौजमजेस जास्त प्रधान्य द्याल. चंगळवादी व विलासी वृत्ती जोपासाल. जुन्या मित्रांच्या सहवासात गतस्मृती ना उजाळा द्याल. आनंदी दिवस.

तूळ – (शुभ रंग – भगवा)
प्रॉपर्टी संबंधात काही व्यवहार अर्धवट राहिले असतील तर ते मार्गी लागतील. आज विद्यार्थ्यांकडून काहीतरी कौतुकास्पद कामगिरी होईल. खेळाडूंनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.

वृश्चिक – (शुभ रंग – मोतिया)
व्यवसायात जाहिरातीवर खर्च करावा लागणार आहे. आपली काही जुनी तत्त्व गुंडाळून ठेवावी लागतील. उत्पादनाचा दर्जाही वाढवणे गरजेचे आहे. तसेच कामाचे तासही वाढवावे लागतील.

धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
अती धावपळ टाळा. हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्टवर्क करण्यावर भर द्या. आज व्यवसायात तुम्हाला काही उत्तम संधी चालून येणार आहेत. संधीचा फायदा घेणे तुमच्या हाती आहे.

मकर – (शुभ रंग – राखाडी)
आज तुमची प्रकृती ठणठणीत असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. वेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. आज जोडीदारास एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल.

कुंभ – (शुभ रंग – आकाशी)
आज तुम्हाला काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. अनावश्यक खर्चास तात्काळ ब्रेक गरजेचा आहे. अति आवश्यक नसतील तर दूरचे प्रवास टाळा.

मीन – (शुभ रंग – निळा)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. काही अनपेक्षित लाभ होण्याचीही शक्यता आहे.  आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास मान राहील. आज सज्जनांचे पाय घराला लागतील.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment