Today’s Horoscope 05 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 05 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख – 05.04.2024.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – पापमोचनी एकादशी.

राहू काळ – दुपारी 10.30  ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – धनिष्ठा 18.07  पर्यंत नंतर शततारका. 

चंद्र राशी – मकर 07.13  पर्यंत नंतर कुंभ.

—————————–

मेष  ( शुभ रंग- क्रीम)

पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर काही लाभ पदरात पडेल. मित्रमंडळीत तुमच्या शब्दाला मान राहील. आज मित्रांनी केलेली खोटी स्तुती फार मनावर घेऊ नका. छान दिवस.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. उच्चशिक्षित तरुणांना चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्याल.

मिथुन (शुभ रंग – निळा)

नोकरदारांना वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. आज उद्योग व्यवसायात काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागेल. तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे कल वाढेल.

कर्क ( शुभ रंग- लाल)

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. भागीदारी व्यवसायात संशयाचे वातावरण राहील. शब्दांचा वापर गरजेपेक्षा जास्त नको. डोके शांत ठेवून ड्रायव्हिंग करा.

सिंह ( शुभ रंग- मरून)

नोकरीधंद्यात उत्साहाचे वातावरण राहील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आनंदी दिवस.

कन्या (शुभ रंग- आकाशी)

नोकरदारांवर कामाचा ताण वाढणार आहे. कार्यक्षेत्रात आज मानसिक संतुलन डळमळीत करणाऱ्या काही घटना घडतील. आज तुम्हाला विश्रांतीची ही गरज भासेल.

तूळ (शुभ रंग- डाळिंबी)

विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती पाहून पालक समाधानी असतील. मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आज काही हौशी मंडळी सहकुटुंब मौजमजेला प्राधान्य देतील.

वृश्चिक ( शुभ रंग- केशरी)

आज तुम्हाला काही कौटुंबिक प्रश्नात लक्ष घालावे लागेल. गृहिणींना गृह उद्योगातून चांगली मिळकत होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मान मोडून अभ्यास करावा लागणार आहे.

धनु (शुभ रंग- चंदेरी)

एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल. सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदराला पात्र होतील  प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील. आज घराबाहेर वाद टाळावे.

मकर (शुभ रंग- सोनेरी)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून आज तुमची आर्थिक बाजू बळकट असेल. बोलताना मात्र शब्द जपूनच वापरा. अति स्पष्ट वक्ते पणाने काही चांगली नाती दुरावली जातील.

कुंभ ( शुभ रंग- भगवा)

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल इतरांना अशक्य ते तुम्ही शक्य करून दाखवाल. अहंकारला मात्र थारा देऊ नका. आज वैवाहिक जीवनातील मतभेद ही फार ताणू नका.

मीन (शुभ रंग- जांभळा)

आज तुम्हाला काही अत्यावश्यक देणी चुकवावी लागतील. जमाखर्चाचा तराजू समतोल ठेवण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करावे लागतील. दूरच्या प्रवासात सावध रहा.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.