Today’s Horoscope 05 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 05 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख -05.12.2023.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस. 

आज विशेष – कालभैरव जयंती.

राहू काळ – दुपारी 3.00 ते  4.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – पूर्व फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.

—————————–

मेष – ( शुभ रंग – राखाडी)

कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील. तुमच्या प्रामाणिक मेहेनतीस नशिबाची ही उत्तम साथ मिळेल.

वृषभ – ( शुभ रंग- केशरी)

व्यापार उद्योगाला चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम राहाल. स्थावराचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहावे.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)

जात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. अति आत्मविश्वासही आज नुकसानास कारणीभूत ठरेल. काही अति हुशार मंडळी भेटतील. आज कमीच बोला.

कर्क – ( शुभ रंग – आकाशी)

कार्यक्षेत्रातील नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पाहुण्यांची उठवस गृहिणी आनंदाने करतील.

सिंह – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दाला मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत तुम्ही लक्ष घालाल. प्रवासात खोळंबा होईल.

कन्या – ( शुभ रंग- हिरवा)

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. आज फक्त स्वार्थाकडे लक्ष असावे. परमार्थ परवडणारा नाही.

तूळ – ( शुभ रंग- गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज तुमच्यापुढे नमते घेतील. संततीकडून महत्त्वाच्या बातम्या येतील.

वृश्चिक – ( शुभ रंग – गुलाबी)

आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे कराल. हाताखालच्या माणसांवर तुमचा

वचक राहील. विरोधकांनाही तुमच्या कामाची पद्धत आता आवडू लागेल.

धनु – (शुभ रंग- मोतिया)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. पण हातचे सोडून पळता मागे धावायचा मोह टाळा. स्वतःवर संयम असू द्या. ज्येष्ठांना उपासनेची प्रचिती येईल.

मकर- ( शुभ रंग – क्रीम)

आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस आहे. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनःशांती मिळेल. आज कोणतेच धाडस नको.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)

सगळी महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. संध्याकाळी जोडीदारास वेळ देणे हिताचे.

मीन – ( शुभ रंग- जांभळा)

लोकर दारांवर वरिष्ठांचा वर्धहस राहील यापूर्वीचे कष्ट कारणे लागतील पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर निवडतील आज तब्येत थोडी नरमच असेल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.