Today’s Horoscope 05 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 05 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

05.02.2023.

शुभाशुभ विचार – 11 नंतर चांगला दिवस.

आज विशेष- माघस्नान समाप्ती.

राहू काळ – सायंकाळी 04.30  ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- पुष्य 12.13 पर्यंत नंतर आश्लेषा.

चंद्र राशी – कर्क.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- मोरपंखी )

बेरोजगारांना आपल्याच शहरात काही नोकरीच्या संधी येतील. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. मुलांच्या वाढत्या मागण्या पुरवाव्या लागणार आहेत.

वृषभ (शुभ रंग- चंदेरी )

आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. काही मोफत सल्लागार मंडळी संपर्कात येतील. हो ला हो करून विषय संपवा.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )

आज घरात प्रिय पाहुण्यांचे आगमन संभवते. अति स्पष्ट बोलण्यापेक्षा गोड बोलणे हिताचे राहील. आज कुणालाही मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका. आज दिवस लाभाचा.

कर्क (शुभ रंग- मरून )

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. कुणी केलेल्या खोट्या स्तुटीनेही भारावून जाल. आज गोडबोल्या मंडळींपासून दूरच राहाल तर बरे. मोहात अडकू नका.

सिंह (शुभ रंग- पांढरा )

आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. संध्याकाळी अनपेक्षितपणे एखादा मोठा खर्च उद्भवू शकेल.

कन्या ( शुभ रंग- डाळिंबी )

आज आनंदी व उत्साही दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पडतील. कार्यक्षेत्रात केलेले कष्ट कारणी लागतील व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज रिकामटेकड्या गप्पा टाळून फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. ध्येयप्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. नोकरदारांना आज वरिष्ठांच्या दडपणात काम करावे लागेल.

वृश्चिक (शुभ रंग- सोनेरी )

नोकरीच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. बिनचूक कामास प्राधान्य देणे गरजेचे आहे. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडून देऊ नये.

धनु- (शुभ रंग- पिस्ता )

नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत ठरू शकेल. संयम बाळगणे गरजेचे.

मकर ( शुभ रंग- निळा )

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल.

कुंभ (शुभ रंग – गुलाबी )

नोकरीच्या ठिकाणी घडलेल्या काही मनाजोगत्या घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. आज अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कायद्याच्या चौकटीत राहणे हिताचे. किरकोळ दुखण्याकडे ही दुर्लक्ष नकोच.

मीन -(शुभ रंग – राखाडी )

आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल वाणीत गोडवा ठेवून अनेक बिकट प्रश्न मार्गी लावू शकाल. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून आज महत्त्वाचा फोन येईल. प्रेम प्रकरणांना ग्रीन सिग्नल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.