Today’s Horoscope 05 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार मंगळवार, दि​. 05 जानेवारी 2021

  • शुभाशुभ विचार – 17 नंतर चांगला
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तराफाल्गुनी 18.21 पर्यंत नंतर हस्त.
  • चंद्र राशी –  कन्या.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – डाळिंबी)
दिवस तितकासा अनुकूल नसला तरीही आज काही येणी असतील तर मात्र वसूल होऊ शकतील. कार्यक्षेत्रात विरोधकांचा उपद्रव वाढेल. जिभेचे चोचले पुरवू नका. पोट बिघडेल.

वृषभ – (शुभ रंग – पिस्ता)
आज तुम्हाला आर्थिक उन्नतीचे विविध मार्ग खुले होतील. रुग्णांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकेल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात संध्याकाळचा वेळ मजेत जाईल.

मिथुन – (शुभ रंग – पांढरा)
आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. आप्तस्वकीयात वावरताना वाणीत मृदुता असू द्या.

कर्क – (शुभ रंग – राखाडी)
आज कार्यालयीन कामासाठी काही जवळपासचे प्रवास घडतील. अति स्पष्टवक्तेपणामुळे नाती दुरावतील. गृहिणींनी सासुबाईकडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.

सिंह – (शुभ रंग – भगवा)
आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचेही विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. पूर्वीच्या कष्टाचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. घरात आर्थिक सुबत्ता नांदेल. पाहुण्यांची वर्दळ राहील.

कन्या – (शुभ रंग – हिरवा)
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. उद्योग व्यवसायात आक्रमकतेने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल.

तुळ – (शुभ रंग – केशरी)
ज्येष्ठ मंडळींनी आज प्रकृतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. देण्याघेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात करावेत. खर्चाचे प्रमाण आवाक्याबाहेर जाणार आहे.

वृश्चिक – (शुभ रंग – नारंगी)
व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. ध्यानीमनी नसताना काही जुनी येणी वसूल होतील.

धनु – (शुभ रंग – गुलाबी)
नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल प्रमोशनची चाहूल लागेल. मामा मावशीकडून काही सुवार्ता येतील. नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दोन हात दूरच रहा.

मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुम्हाला कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळीत मिळून-मिसळून राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)
आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणे हिताचे राहील. कायद्याची चौकट स्वप्नातही मोडू नका.

मीन – (शुभ रंग – मोरपंखी)
घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. वैवाहिक जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटले तरी हातचे राखूनच बोलणे हिताचे राहील.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.