Today’s Horoscope 05 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 05 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – सोमवार.

05.06.2023.

शुभाशुभ विचार – क्षयतिथी.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 07.30  ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र- मूळ.

चंद्र राशी – धनु.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- पांढरा )

उद्योगधंद्याच्या दृष्टीने आजचा दिवस विरोधी आहे. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. हातसे सोडून पळत्या मागे धावू नका. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. व्यस्त दिवस.

वृषभ (शुभ रंग- मरून)

आज फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. गाडीच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हाऊस मौज करताना कायद्याचे भान ठेवा, सतर्क रहा.

कर्क (शुभ रंग- हिरवा.)

कार्यक्षेत्रात प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकणे गरजेचे आहे. नव्या ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. विरोधक सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करून चालणार नाही.

सिंह (शुभ रंग- गुलाबी)

आज तुमच्यातील चैनी व विलासी वृत्ती वाढेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)

स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील प्रेम प्रकरणात नसती आफत होईल.

तूळ ( शुभ रंग- राखाडी)

आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. आज काम कमी व दगदगच जास्त होईल.

वृश्चिक (शुभ रंग- पिस्ता)

धंद्यात येणी वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्याल. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमचे मन काहीसे चंचल असेल. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घेऊन बसाल दोनशे प्रवास त्रासदायक होऊ शकतात. आज तुम्ही स्वतःचेच खरे कराल.

मकर ( शुभ रंग- केशरी )

पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील पासपोर्ट विजा संबंधित कामे गती घेतील. कठोर बोलण्याने चांगली नाती दुरावतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण कमी करायला हवे.

कुंभ (शुभ रंग – आकाशी)

आज तुमचा स्वप्नपूर्तीचा दिवस असल्याने शुभ चिंता. तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णयही आज योग्य ठरतील. काही दुरावलेले नाती सुद्धा जवळ येतील. कमी श्रमात जास्त लाभ पदरात पडेल.

मीन (शुभ रंग – निळा )

नोकरदारांना आज वरिष्ठांचे दडपण जाणवेल. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेस लागतील. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट गरजेचे आहेत मित्रांच्या नादी अजिबात लागू नका.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.