Today’s Horoscope 05 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – बुधवार . 05 मे  2021

  • शुभाशुभ विचार — उत्तम दिवस.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ — दुपारी 12.00 ते 01.30
  • दिशा शूल -उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – धनिष्ठा 09.11 पर्यंत. नंतर शततारका.
  • चंद्र राशी – कुंभ.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – पिस्ता)

दैनंदिन सर्व कामे सुरळीत पार पडतील. स्वतःचे काही छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस आहे. काही अपुरी स्वप्ने पूर्ण होतील.

वृषभ – ( शुभ रंग- क्रीम)

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होईल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हिताचे आहे. पिताश्री आज योग्य सल्ला देतील मित्रांना मात्र लांब ठेवा.

मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे फळ मिळेल.

कर्क –  (शुभ रंग- सोनेरी)

काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. पोट बिघडणार आहे, खाण्यापिण्यावर ताबा गरजेचा तरुणांनी चुकीची संगत टाळणे हिताचे राहील.

_MPC_DIR_MPU_II

सिंह – (शुभ रंग – पांढरा)

आज नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील.  इच्छित ध्येय साध्य होतील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.

कन्या – (शुभ रंग- गुलाबी)

आज काही अप्रिय माणसे संपर्कात येतील. मोफत सल्लगार मंडळीही भलतेच बोअर करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. ऐकावे जनाचे करावे मनाचे हे लक्षात असूद्या.

तूळ – ( शुभ रंग- मोरपिशी)

मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. आज तुम्हाला आपल्या आवडत्या क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळेल. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल.

वृश्चिक – ( शुभ रंग- केशरी )

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्णही कराल.  घराच्या नूतनीकरणाचे मनावर घ्याल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीने आनंदित व्हाल.

धनु – ( शुभ रंग-आकाशी)

नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. आत्मविश्वासाचा ही अतिरेक नको, कारण त्याने निराशा पदरी पडू शकते.

मकर – (शुभ रंग- जांभळा)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने आज आत्मविश्वासाने स्वीकाराल. विरोधकांना आज तुम्ही चोख उत्तर द्याल. लहान भावंडांस मदत कराल.

कुंभ – ( शुभ रंग – सोनेरी)

आज हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर महागात पडेल. एखादा शेरास सव्वाशेर भेटू शकतो सावध राहा.

मीन – ( शुभ रंग – निळा )

आज आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. मोठ्या लाभाच्या मोहाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment