Today’s Horoscope 06 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 06 December 2023
आजचा दिवस – बुधवार.
तारीख – 06.12.2023
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह 10.22 पर्यंत नंतर कन्या.
—————————–
मेष – ( शुभ रंग – आकाशी)
आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष द्या.

वृषभ ( शुभ रंग- पिस्ता)
आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. तुमच्या सामाजिक प्रतिश्ठेत वाढ होईल. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. गृह सौख्य लाभेल.

मिथुन – ( शुभ रंग- केशरी)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासच्या प्रवासात फायदेशीर ओळखी होतील.

कर्क – ( शुभ रंग – राखाडी)
व्यवसायात आवक मनासारखी असेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस आहे.

सिंह -( शुभ रंग – गुलाबी)
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द पाळण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल.

कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)
आज तुम्ही जरा लहरीपणे वागाल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. तरुणांना प्रलोभने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. मोठेपणा घेण्यासाठी खर्चही कराल. आज हार्डवर्क न करता स्मार्टवर्क करण्याकडे तुमचा कल असेल.

वृश्चिक ( शुभ रंग – जांभळा)
नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील.

धनु (शुभ रंग- क्रीम)
आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के राहील. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी राहील. नास्तिक मंडळी ही गरजेपुरती श्रद्धाळू होणार आहेत.

मकर- ( शुभ रंग – मोतिया)Today’s Horoscope 06 December 2023
जे चाललंय ते बरच म्हणावं लागेल. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह नको. धाडसाची कामे आज टाळली तर बरे होईल. सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो.

कुंभ – (शुभ रंग- पांढरा)
वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदारास दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही उगीचच इतरांच्या भानगडीत डोकवाल.

मीन ( शुभ रंग- पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की लाभेल.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.