Today’s Horoscope 06 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 06 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – सोमवार.

06.02.2023.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष- गुरु प्रतिपदा.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र- आश्लेषा 15.03 पर्यंत नंतर मघा.

चंद्र राशी – कर्क 15.03 पर्यंत नंतर सिंह.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

जमीन खरेदी विक्रीचे काही अपुरे व्यवहार आज मार्गी लागू शकतील. विद्यार्थ्यांना कठीण विषयांची ही गोडी निर्माण होईल. गृहिणींना तर आज अजिबात उसंत मिळणार नाही.

वृषभ (शुभ रंग-गुलाबी )

आजचा दिवस खूप धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट काळजीपूर्वक वाचून घ्या.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा )

आज तुमची मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात, फार अर्जंट नसतील तर टाळावेत.

कर्क (शुभ रंग- डाळिंबी  )

कमी श्रमात जास्त लाभाच्या अपेक्षेने आज निराशाच पदरात पडू शकते. महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचार करून घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले खूप महत्त्वाचे असतील.

सिंह (शुभ रंग- हिरवा )

आज तुमच्या स्वभावातील मी पणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. गोड बोलल्याने बरीच अवघड कामे सोपी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

कन्या ( शुभ रंग- मरून )

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

तूळ ( शुभ रंग- निळा )

यशस्वी लोकांच्या सहवासात आज तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल. अतिव्यस्त दिवस.

वृश्चिक (शुभ रंग- पिस्ता )

आज घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वादविवाद संभवतात. तुम्हाला आज जरा एकांताची गरज भासेल. ज्येष्ठ मंडळींची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

धनु- (शुभ रंग- सोनेरी )

आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. नोकरीच्या ठिकाणी आज नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा. हितशत्रू         टपूनच बसलेत सतर्क रहा.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज सामंजस्य असून काही जुन्या आठवणी तुमच्या मनाला आनंद देतील. उत्साहपूर्ण दिवस.

कुंभ (शुभ रंग – चंदेरी )

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील. आरोग्य विषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. दुकानदारांची थकलेली येणी वसूल होतील.

मीन -(शुभ रंग – मोरपिशी )

नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळेल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.