Today’s Horoscope 06 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार बुधवार …. ​दि​.  06 जानेवारी 2021

  • शुभाशुभ विचार –उत्तम दिवस.
  • आज विशेष — कालाष्टमी.
  • राहू काळ – दुपारी १२.०० ते १.३०
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – हस्त १७.०९ पर्यंत नंतर चित्रा.
  • चंद्र राशी – कन्या.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – क्रीम)

आजारी व्यक्तींनी पथ्य पाळण्याची काळजी घ्यायला हवी आहे. डॉक्टरांचा सूचना तंतोतंत पाळा अन्यथा एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे.

वृषभ – ( शुभ रंग- पांढरा)

घरात आधुनिक सुख सुविधांसाठी खर्च कराल नव्या नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येतील. गूढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

मिथुन – (शुभ रंग- राखाडी)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून आज कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

कर्क – (शुभ रंग मोतीया)

दैनंदिन कामातही काही अडचणींचे डोंगर उभे राहतील. कर्ज मंजुरी च्या कामात काही अडथळे येतील. मुलांना आज अभ्यास सोडून सर्व काही सुचेल. घराबाहेर वाद टाळा.

सिंह – (शुभ रंग- हिरवा)

आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरणार आहेत. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. आज काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पायधूळ झाडतील.

कन्या – (शुभ रंग – लाल)

व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल. आज अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची साथ मोलाची राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव राहील

तुळ – ( शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्हाला काही देणी चुकवावी लागणार आहेत. हौस-मौज करण्यावर थोडी मर्यादा येईल. आज जरा डोळ्यांची निगा राखा. महत्वाच्या कामासाठी भटकंती होईल.

वृश्चिक – (शुभ रंग- गुलाबी)

आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील. प्रतिष्ठित लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घ्याल. संततीकडून काही सुवार्ता येतील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा धनलाभ संभवतो.

धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागणार आहे. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. महिलांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळेल.

मकर – (शुभ रंग- भगवा)

शासकीय कामे रखडणार आहेत. नोकरीत वरिष्ठांचे समाधान होणे केवळ अशक्य. गृहिणींचा आज देव धर्माकडे ओढा राहील. आणि आज देव नवसाला पावेल सुद्धा.

कुंभ – ( शुभ रंग- केशरी)

कुठेही गुंतवणूक करताना झटपट लाभाचा मोह टाळा. आज गोडबोल्या मंडळी पासून दोन हात दूरच राहणे हिताचे. आज कोणतीही रिस्क नकोच. फक्त नाकासमोर चालण्यास प्राधान्य द्या.

मीन – (शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. ध्येयाचा पाठलाग करताना प्रकृतीकडे दुर्लक्ष होणार आहे. वैवाहिक संबंधात मधुरता राहील. आज पत्नीचे सल्ले डावलू नका.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.