Today’s Horoscope 06 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 06 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार.

06.06.2023

शुभाशुभ विचार – 14 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 03.00 ते04.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र- पूर्वाशाढा.

चंद्र राशी – धनु.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येऊ शकते. आज काही फसव्या संधी येतील. तरीही हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळायला हवा.

वृषभ (शुभ रंग- हिरवा)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकलायला हवेत. वैवाहिक जीवनातील गैरसमज सुसंवादाने दूर होतील.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. कार्यक्षेत्रात काही पेच प्रसंगांना सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदार म्हणेल त्याला होच म्हणा.

कर्क (शुभ रंग- लाल)

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील.

सिंह (शुभ रंग- मरून)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. आज काही बिकट प्रसंग सहजच सुटू शकतील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल. उत्साह पूर्ण दिवस.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी)

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. शेअर्स व्यवहारात तुमचे अंदाज खरे ठरतील. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम राहाल. आज मातोश्री कडून लाभ संभवतो.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता)

आजचा तुमचा बराचसा वेळ घराबाहेरच जाईल. आज झालेल्या काही नव्या ओळखी व्यवसाय वृद्धीसाठी फायदेशीर ठरतील. आज लहान भावास मदत कराल.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमची काही येणे असतील तर अन्य अपेक्षित पणे वसूल होतील. वक्ते व्यासपीठ गाजवतील. घरी हवेहवेसे वाटणारे पाहुणे येतील. आज प्रवासाची दगदग टाळलेली बरी.

धनु- (शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. इतरांस न झोपणारी कामे सहजच पूर्ण कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा.

मकर ( शुभ रंग- भगवा )

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. एकाच्या भरोशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. काही फसव्या संधी येतील.  प्रलोभनांपासून दूरच रहा. अनावश्यक खर्चात कपात गरजेची.

कुंभ (शुभ रंग – निळा)

नोकरीच्या ठिकाणी काही उत्साह पूर्ण घटना घडतील. वरिष्ठ तुमची मते ऐकून घेतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. आज वाहतुकीचे नियम पाळायला हवेत.

मीन -(शुभ रंग – आकाशी )

नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आज वडिलांचे सल्ले विचारात घ्या.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क-9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.