Today’s Horoscope 06 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – शनिवार – 06 मार्च 2021

  • शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र -ज्येष्ठा 21.38 पर्यंत नंतर मूळ.
  • चंद्र राशी –   वृश्चिक 21.38 पर्यंत नंतर धनु.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – लाल )
काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. खाण्यापिण्यावर कंट्रोल गरजेचा आहे. कुसंगत व झटपट लाभाचा मोह टाळावा. वैवाहिक जीवनात शब्दांचा वापर कमीच  करा.

वृषभ – ( शुभ रंग – पिस्ता)

नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील  एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. आज पत्नीला दिलेली वचने पाळाल.

मिथुन – ( शुभ रंग- क्रीम)

काही अप्रिय माणसे संपर्कात येतील. मोफत सल्लागार मंडळी भलतेच बोर करतील. आज संयमाची गरज, ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच धोरण योग्य. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांच्या भेटीचे योग दिसतात.

कर्क – ( शुभ रंग -चंदेरी)

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहाल. आवडत्या क्षेत्रात उत्तम संधी मिळतील. काही जणांचा आज गूढ शास्त्राकडे कल वाढेल. नवोदित कलाकारांना प्रसिद्धी मिळेल. व्यवसाय तेजीत चालतील.

सिंह- (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

काही मनाजोगत्या घटनांनी तुमचे मनोबल वाढेल. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. इतरांना आज मदत करू शकाल. सासूबाईंनी केलेल्या कौतुकाने गृहिणी धन्य होतील.

कन्या – ( शुभ रंग – हिरवा)

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकाराल व त्या पूर्ण कराल. आज जरा मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस करा.

तूळ – ( शुभ रंग- जांभळा)

आर्थिक स्थिती आज उत्तम असून तुमचे मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. आज संध्याकाळी सहकुटुंब चैन करणार आहात. अति सडेतोड बोलणे टाळा,  त्यामुळे नाती दुरावतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- मरून)

आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मान पान मिळेल. आज तुमचे मन काहीसे चंचल असेल. एखादी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्याल.

धनु – (शुभ रंग- भगवा)

जमाखर्चाची तोंड मिळवणी करणे आज जरासे अवघड जाईल. गृहिणींना पूर्वी केलेली बचत कामी येईल. प्रवास होतील. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

मकर – ( शुभ रंग – निळा)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहिल. नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी चालून येतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)

आज तुम्ही अतिउत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. अधिकारांचा योग्य वापर करण्याची वेळ येणार आहे. भिडस्तपणा नको.

मीन – ( शुभ रंग – मोतीया)

कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. वादविवादात आज तटस्थ रहा. थोडे अध्यात्माकडे वळणे हिताचे राहील.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.