Today’s Horoscope 07 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  रविवार. …. ​दि​.  07 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार -16 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष –शट तिला एकादशी.
  • राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 6.00
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – ज्येष्ठा 16.15 पर्यंत, नंतर मूळ.
  • चंद्र राशी – वृश्चिक 16.25 पर्यंत नंतर धनु.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग राखाडी)
वाहतुकीचे नियम तोडल्यास दंड भरावाच लागेल. गृहिणींचा आज देव धर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेलही. दुपारनंतर काही शुभ समाचार येतील. नोकरदारांनी वरिष्ठांच्या फार जवळ जाऊ नये.

वृषभ – ( शुभ रंग – डाळिंबी)
आज तुमची सर्व कामे विनाव्यत्यय वेळेवर पार पडतील. संध्याकाळी थोडेफार आर्थिक नुकसान संभवते. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतीलच.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता )
नकळत झालेल्या चुकीमुळे काही आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदिन कामात काही अनपेक्षित अडथळे येतील. संसारिक मतभेद संध्याकाळी मिटतील. आज कोणतीच रिस्क नको.

कर्क – (शुभ रंग- क्रीम )
आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनातील काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. कोर्टाची पायरी न चढलेली बरी.

सिंह – ( शुभ रंग- जांभळा)
मुलांचे वाढते हट्ट पुरवावे लागतील. कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. गृहिणींना रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. ज्येष्ठांना प्रकृती साथ देईल.

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)
घरात आज तुम्ही आधुनिक सुख सुविधांसाठी खर्च कराल. प्रॉपर्टी च्या व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. टेलिफोन व लाईट बिले भरावी लागणार आहेत. मुलांच्या शिस्ती कडे लक्ष द्यावे लागेल.

तूळ – ( शुभ रंग – लाल)
आज आवक मनाजोगती असल्याने तुमची मनस्थिती ही उत्तमच असेल. त्याचबरोबर खर्चही विविध मार्ग तुम्हाला खुणावतील. विविध जाहिराती गृहिणींना भुरळ घालतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- चंदेरी)
आज जोखमीची कामे टाळली तर बरे होईल. जे काही करायचे ते तब्येतीस जपूनच करा कायद्याची चौकट मोडण्याचा विचारही करू नका. अति आत्मविश्वास आर्थिक नुकसानास कारणीभूत ठरेल.

धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज घरात काहीतरी कारणाने वडिलधार्‍यांशी खटके उडू शकतात. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात.काही महत्त्वाची घरेलु कामे दुर्लक्षित होतील.

.

मकर – ( शुभ रंग- पांढरा)
उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत. संध्याकाळी मित्रांबरोबर काही वैचारिक मतभेद होतील.

कुंभ – ( शुभ रंग- निळा)
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर कार्यक्षेत्रात इच्छित ध्येय साध्य कराल. एखाद्या नवीन क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल. दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)
आज नोकरीत कामाचा प्रचंड ताण राहील. वरिष्ठ गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेतील. कामाच्या ठिकाणी असलेले नियम तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. प्रकृतीकडे ही दुर्लक्ष नको.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.