Today’s Horoscope 07 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 07 February 2023
वार – मंगळवार.
07.02.2023
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
दिशा शूल- उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – मघा 17.45 पर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. तरुण वर्गाचा आज मौज मजा करण्याकडे कल असेल. गृहिणी आज स्वतःसाठी वेळ काढतील.

वृषभ (शुभ रंग- गुलाबी)
व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम राहाल. स्थावरचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहावे.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा )
ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. काही अति हुशार मंडळी भेटतील, आज कमीच बोला. गृहिणींना शेजार धर्म पाळावा लागणार आहे.

कर्क (शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकारल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पाहुण्यांची उठबस आनंदाने कराल. जमाखर्चाचा तराजू समतोल राहिल.

सिंह (शुभ रंग- डाळिंबी)
कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दास मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत लक्ष घालाल. प्रवासात काही काळ खोळंबा संभवतो.

कन्या ( शुभ रंग- मरून)
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊन अडकू नका. आज फक्त स्वार्थाकडे लक्ष द्या. परमार्थ आज परवडणारा नाही.

तूळ ( शुभ रंग- निळा) – Today’s Horoscope 07 February 2023
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज नमतेच घेतील. संततीकडून महत्त्वाचे समाचार येतील.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)
आज तुम्ही आपल्या ओळखी वापरून इतरांची कामे कराल. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील. विरोधकांनाही तुमचे विचार पटवून देता येतील. मित्र खोटी आश्वासने देतील.

धनु- (शुभ रंग- सोनेरी)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. पण हातचे सोडून पळत्या मागे धावण्याचा मोह टाळा. स्वतःवर संयम ठेवा ज्येष्ठांना उपासनेची प्रचिती येईल.

मकर ( शुभ रंग- राखाडी)
आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनःशांती मिळेल. आज कोणतेही धाडस नको.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. संध्याकाळी जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

मीन -(शुभ रंग – सोनेरी )
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तब्येत थोडी नरमच राहील. येणी असतील तर वसूल होतील. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर नीवळतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pune News : फिरोदिया करंडक स्पर्धेला शनिवारपासून होणार सुरुवात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.