Today’s Horoscope 07 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 07 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार.

07.06.2023.

शुभाशुभ विचार – शुभ दिवस.

आज विशेष – संकष्ट चतुर्थी ( चंद्रोदय 22.38).

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र- उत्तराशाढा  21.03.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

आज ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असेल. कामाच्या व्यापात काही तब्येतीच्या तक्रारीकडे तुमचे दुर्लक्ष होईल. आज खोटी आश्वासने देणारी मंडळी भेटतील.

वृषभ (शुभ रंग- तांबडा)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. सज्जनांचा सहवास लाभेल.

मिथुन ( शुभ रंग- मोतिया )

आज कोणतीही धाडसाची काम करू नका. सावध रहा. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य नाही. मोठ्या नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकललेली बरी.

कर्क (शुभ रंग- पांढरा)

परिवारात आज खेळीमेळीचे वातावरण असल्याने तुम्ही आज घराबाहेर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची तुम्हाला खंबीर साथ मिळेल.

सिंह (शुभ रंग- लाल)

कोणतीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठांकडून मान्य होतील.

कन्या ( शुभ रंग- मरून)

हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा खर्च कराल नवोदित कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात येतील.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी)

कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करायचा आज तुमचा मूड असेल काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. गृहिणी मुलांच्या अभ्यासात लक्ष देतील.

वृश्चिक (शुभ रंग- केशरी)

शेजार्यांशी क्षुल्लक कारणाने झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे घराबाहेर वाद नको.

धनु- (शुभ रंग- पिस्ता)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. मनी योजाल ते तडीस न्याल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडू शकेल. दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

खर्च कितीही वाढला तरीही पैशाची कमतरता भासणार नाही. आज कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना चांगला वाव मिळेल. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.

कुंभ (शुभ रंग – जांभळा)

आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचार करून काही उपयोग नाही. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. काही अनावश्यक खरेदी ही कराल. प्रवासात मात्र झोपू नका

मीन -(शुभ रंग – निळा )

जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा आज तुमचा प्रयत्न राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवारांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.