Today’s Horoscope 07 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – शुक्रवार, दि. 07 मे  2021

  • शुभाशुभ विचार – १९.०० नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – वरुथिनी एकादशी.
  • राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा १२.३६ पर्यंत नंतर उत्तराभाद्रपदा
  • चंद्र राशी – मीन.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – राखाडी)
आज स्वार्थाकडे लक्ष असू द्या. दानधर्म करताना स्वतःची शिल्लक तपासा. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळले तर बरे होईल. तातडीचे प्रवास संभवतात.

वृषभ – (शुभ रंग – मरून)
आत्मविश्वासाने नवे उपक्रम राबवू शकाल. पैशाअभावी रखडलेली कामे सुरू करता येतील. लघु उद्योजकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील.

मिथुन – (शुभ रंग – पिस्ता)
नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य राहिल. तुमची सकारात्मकता वाढेल.

कर्क – (शुभ रंग – गुलाबी)
कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घ्यायची तयारी ठेवा. उपासनेत खंड पडू देऊ नका.

सिंह – (शुभ रंग – चंदेरी)
आज काही अतिहुशार मंडळी संपर्कात येतील. वाद-विवाद होतील. जरा डोके शांत ठेवण्याची गरज आहे. वाहन चालवताना डोक्यात विचारांची गर्दी नको.

कन्या – (शुभ रंग – पांढरा)
आज नोकरीच्या ठिकाणी हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क करून लवकर घर गाठाल.  थोडी चंगळवादी व विलासी वृत्ती राहील. वैवाहिक जीवनात आज दोघात तिसरा येऊ देऊ नका.

तूळ – (शुभ रंग – नारिंगी)
व्यवसायात ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तुमची तयारी असेल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश निश्चित मिळणार आहे. आज तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा नको.

वृश्चिक – (शुभ रंग – सोनेरी)
नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. तुमची काही गुपिते उघड होतील. आज कामापुरतेच बोलणे हिताचे राहील.

धनु – (शुभ रंग – निळा)
आज अथक परिश्रमांच्या साह्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील.  काही योग्य माणसे आज संपर्कात येतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल. आशादायी दिवस

मकर – (शुभ रंग – आकाशी)
नकळत झालेल्या चुकीमुळे काही आर्थिक नुकसान होऊ शकेल. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करतील. विनाकारण शेजाऱ्यांच्या भानगडीत लक्ष घालू नका.

कुंभ – (शुभ रंग – जांभळा)
अत्यंत आनंदी उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून. परिवारात सामंजस्य राहील.

मीन – (शुभ रंग – क्रीम)
आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून विश्रांतीस प्राधान्य द्या.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.