Today’s Horoscope 07 September 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – मंगळवार, दि. 07 सप्टेंबर 2021

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वाफाल्गुनी 17.05 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी
  • चंद्र राशी – सिंह 22.50 पर्यंत  नंतर कन्या.

—————————————

आजचे राशीभविष्य. 

मेष – (शुभ रंग – पिस्ता)
आज काही जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. घर खरेदीविक्रीचे व्यवहार फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. खेळाडू स्पर्धा जिंकतील.

वृषभ – (शुभ रंग – मरून)
नोकरीच्या ठिकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. आज आईने दिलेले सल्ले योग्यच असतील.

मिथुन – (शुभ रंग – राखाडी)
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे आज तुमच्या जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. शेजारी सलोखा राहील.

कर्क – (शुभ रंग – पांढरा)
कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते. अतिशय स्पष्ट बोलून काही जिवाभावाची नाती दुखावू नका. शेजाऱ्यांशी काही सौम्य स्वरूपाचे मतभेद संभवतात.

सिंह – (शुभ रंग – हिरवा)
भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेतेमंडळींची समाजात लोकप्रियता वाढेल. कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल.

कन्या – (शुभ रंग – सोनेरी)
क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे थोडेफार नैराश्य जाणवेल. आज तुम्ही कोणतेही काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हिताचे.

तूळ –  (शुभ रंग – नारिंगी)
नोकरीत तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. कष्टाच्या प्रमाणात मोबदलाही पुरेसा राहील. व्यवसायात सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.

वृश्चिक – (शुभ रंग – केशरी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे आज कठीण जाईल. जितके कमी बोलाल तितके चांगले राहील. अधिकारांचा वापर जपून करा.

धनु – (शुभ रंग – मोरपंखी)
वैवाहिक जीवनात आज संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल. आज कुठेही मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा. ज्येष्ठांचा अध्यात्मिक

मकर – (शुभ रंग – आकाशी)
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावा लागेल, काही मनाविरुद्ध घटना आज मनास बेचैन करतील. आज थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. व्यर्थ वाद टाळा.

कुंभ – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. तरुणांना घरातील थोरांचे विचार पटणार नाहीत. नोकरदारांना कामावर दांडी मारून घरी आराम करायचा मोह होईल.

मीन – (शुभ रंग – गुलाबी)
आजच स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमध्ये मतभिन्नता राहील. सगळी महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करा.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.