Todays Horoscope : 08.06.2023 जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : Todays Horoscope : 07.06.2023 जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग -वार – गुरूवार. 08.06.2023, शुभाशुभ विचार – 19 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र- श्रवण 18.59 पर्यंत नंतर धनिष्ठा.
चंद्र राशी – मकर.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- पांढरा )
यशस्वी लोकांच्या सहवासात आज तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघडच होईल. आज अतिव्यस्त दिवस.
वृषभ (शुभ रंग- क्रीम)
आज घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वादविवाद संभवतात. तुम्हाला आज जरा एकांताची गरज असेल. ज्येष्ठ मंडळींची पावले सत्संगाकडे वळतील.
मिथुन ( शुभ रंग- तांबडा )
आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका. नोकरीच्या ठिकाणी आज नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा. हितशत्रू टपूनच बसलेले आहेत. सतर्क राहायला हवे.
कर्क (शुभ रंग- राखाडी)
व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असून काही नव्या स्मृती मनाला आनंद देतील. आशादायी दिवस.
सिंह (शुभ रंग- गुलाबी)
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील. आरोग्य विषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होईल.
कन्या ( शुभ रंग- केशरी )
नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असेल तर योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळेल.
तूळ ( शुभ रंग- लाल)
जमीन खरेदी विक्री विषयी काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना अवघड विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना तर आज अजिबात उसंत मिळणार नाही.
वृश्चिक (शुभ रंग- मरून)
आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धींगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर कोणत्याही कागदावर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्यावा.
धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमची मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात. फारच अर्जंट नसतील तर टाळावेत.
मकर ( शुभ रंग- पिस्ता )
कमी श्रमांत जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशाच पदरात पडू शकते. महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले महत्त्वाचे असतील.
कुंभ (शुभ रंग – निळा)
आज मी पण तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदू वाणीने बरीच अवघड कामे सोपी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.
मीन -(शुभ रंग – जांभळा )
आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार आहे.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.