Today’s Horoscope 08 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 08 December 2022
वार – गुरुवार.
08.12.2022
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – रोहिणी 12.33 पर्यंत नंतर मृग.
चंद्र राशी – वृषभ.
—————————————-
मेष (शुभ रंग- राखाडी)
आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे हिताचे राहील. किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून स्वार्थ साधून घ्या.

वृषभ (शुभ रंग- निळा)
आज तुमची तब्येत थोडी नरमच राहील. एखादी क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा. मोफत सल्लागार मंडळींना जरा लांबच ठेवलेले बरे.

मिथुन (शुभ रंग- डाळिंबी)
आज पर्यटनाचे व्यवसाय चांगलेच चालतील. घरात थोरमोठ्यांशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. थोडी भटकंती करावी लागेल.

कर्क (शुभ रंग- पांढरा)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या काही स्वप्नांची पूर्तता होणार आहे. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करूनच दाखवाल.

सिंह (शुभ रंग- भगवा)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक आदबीने वागतील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल.

कन्या (शुभ रंग- लाल)
महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधारांचे मत अवश्य घ्यावे. वाहतुकीचे नियम मोडून चालणार नाही दंड भरावाच लागेल. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी)
आज विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकतो. सतर्क रहा. मित्रही दगा देणारेच भेटतील. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे आवश्यक आहे. वाहन चालवताना जपून.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम)
आज उंची व विलासी वृत्ती वाढेल. उंची वस्त्र खरेदी कराल शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज तेजीत चालतील. नवोदित कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

धनु- (शुभ रंग- केशरी) – Today’s Horoscope 08 December 2022
स्थावर शेतीवाडी संबंधित काही कौटुंबिक कलहांना आज तोंड द्यावे लागेल. प्रेम प्रकरणे मनस्तापच देणार आहेत. जुन्या प्रकृतीच्या तक्रारी डोके वर काढू शकतात.

मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. आज काम कमी व धावपळच जास्त होणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील.

कुंभ (शुभ रंग – जांभळा)
धंद्यात येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सुद्धा करता येईल. आज तुम्ही विरोधकांशीही गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेऊ शकाल. उत्तम दिवस.

मीन (शुभ रंग – मोतिया)
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात घेतलेले निर्णय चुकू शकतील. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल.
.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Maval : इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे डोणे गावात श्रमसंस्कार शिबीर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.