Today’s Horoscope 08 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग -Today’s Horoscope 08 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख – 08.12.2023.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – उत्पत्ती एकादशी.

राहू काळ – सकाळी 10.30ते 12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – हस्त08.54पर्यंत, नंतर चित्रा.

चंद्र राशी – कन्या 21.53 पर्यंत नंतर तुळ.
—————————–
मेष – ( शुभ रंग – केशरी)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. पती-पत्नी मधील काही मतभेद सामंजस्याने मिटतील. जुनी दुखणे अंगावर काढू नका. आज विश्रांतीही गरजेची आहे.

वृषभ ( शुभ रंग- गुलाबी)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

मिथुन – ( शुभ रंग- सोनेरी)
मंदावलेल्या व्यापार उद्योगास तेजी येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून देता येतील. आज प्रॉपर्टीचे व्यवहार लाभ देतील. मातोश्रींचे सल्लेही महत्त्वपूर्ण असतील.

कर्क – ( शुभ रंग – आकाशी)
आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. केवळ चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

 

सिंह -( शुभ रंग – हिरवा)
मृदू वाणीने आज तुम्ही विरोधकांनाही आपले म्हणणे पटवून द्याल. धंद्यातील येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवा.

कन्या – ( शुभ रंग- जांभळा)
महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान ठेवा. तुमचा लहरी व संशयी स्वभाव नियंत्रणात ठेवा.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज संध्याकाळी एखादा मोठा खर्च उद्भवणार आहे. एखादी चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे सतर्क असावे.

वृश्चिक ( शुभ रंग – मरून)
आजच्या दिवसातील काही मनाजोगत्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध राहा. आज विरोधक ही मैत्रीचा हात पुढे करतील.

धनु (शुभ रंग- चंदेरी)
नोकरीत वरिष्ठ तुमच्या रास्त मागण्या मान्य करतील. अधिकार योग चालून येतील. वडील आज तुम्हाला योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि कर्तव्यास प्राधान्य द्या.

मकर- ( शुभ रंग – निळा)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. झटपट लाभाचा मोह करू नका. संयम ठेवा.

कुंभ – (शुभ रंग- सोनेरी)
जास्त लाभाच्या अपेक्षेने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावराच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआपच वळतील.

मीन ( शुभ रंग- राखाडी)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आज एखादा विवाह जुळवण्यात मध्यस्थी करू शकाल.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.