Today’s Horoscope 08 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  सोमवार.. …. ​दि​.  08 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार — उत्तम दिवस.
  • आज विशेष – भागवत एकादशी.
  • राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मूळ 15.21 पर्यंत नंतर पूर्वाषाढा.
  • चंद्र राशी – धनु.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – सोनेरी)
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. कार्यक्षेत्रात मोठ्या आर्थिक उलाढाली अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच करा. ज्येष्ठ मंडळींना सत्संगाची ओढ लागेल.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. विरोधकांशी गोड बोलूनच आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. आज जरा युक्तीने वागा, ताकही फुंकून प्यायला हवे.

मिथुन –  ( शुभ रंग- डाळिंबी)
आज व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. नोकरदार वरिष्ठांची मर्जी संपादन करतील. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
उच्चशिक्षित असाल तर लठ्ठ पगाराच्या नोकऱ्याचे प्रस्ताव येतील. व्यवसायात अडकलेली येणी वसूल होऊ शकतील. आज पत्नीच तुम्हाला योग्य सल्ले देईल.

सिंह – ( शुभ रंग- गुलाबी )
कौटुंबिक जीवन सुखी समाधानी असेल तुम्ही कार्य क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. गृहणी बिझी शेड्युल मधूनही ब्युटी पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील.

कन्या – ( शुभ रंग पांढरा )
कुटुंबीयांमध्ये सामंजस्य राहील. आज तुम्हाला शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. गृहिणी आज स्वच्छतेचे फारच मनावर घेतील. तरुण मंडळी बेफिकीर पणाने वागतील.

तूळ – ( शुभ रंग- पिस्ता)
आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालणार आहेत. कलाकारांना मात्र रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागतील. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

वृश्चिक –  (शुभ रंग- मोरपिशी )
उत्साही व आनंदी असा आजचा दिवस असून विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आज उरकून घ्या. महत्त्वाचे मेल्स येतील. आज अडचणीच्या प्रसंगी लहान भावास मदत कराल.

धनु – ( शुभ रंग- जांभळा)

लहरीपणास आवर घालणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात आपल्या सहकाऱ्यांचे ही ऐकून घ्यायची मानसिकता ठेवा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.

मकर – ( शुभ रंग- नारिंगी)

आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच आहे. काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. संध्याकाळी जोडीदाराशी थोडेफार मतभेद होतील.

कुंभ –  (शुभ रंग- मरून)
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असेल तर चांगल्या संधी चालून येतील. एखाद्या सुरक्षित आर्थिक गुंतवणुकीचा विचार कराल.

मीन – ( शुभ रंग- चंदेरी)
आज केवळ चर्चेपेक्षा फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. वडीलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लावण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी वाद न घालता फक्त हो म्हणून विषय बदलणे हिताचे राहील.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.