Today’s Horoscope 08 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार शुक्रवार . …. ​दि​.  08 जानेवारी 2021

  • शुभाशुभ विचार — ११ पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – स्वाती १४.१२ पर्यंत नंतर विशाखा.
  • चंद्र राशी – तुळ.

.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- निळा )
कार्यक्षेत्रात स्वतःचे वर्चस्व सिद्ध कराल. ध्येयामागे धावताना प्रकृतीकडे तुमचे दुर्लक्ष होईल. पती-पत्नीमधील मतभेद सामंजस्याने मिटतील. व्यवसायात भागीदारांशी सलोखा राहील.

वृषभ – (शुभ रंग – मोरपिशी )
नोकरदार मंडळींना वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. अधिकाऱ्यांना कामगारांच्या प्रश्‍नात लक्ष घालावे लागेल. ज्येष्ठ मंडळींनी विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.

मिथुन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
घरात आधुनिक सुख सुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर अनेक संधी चालून येतील. हौशी मंडळींना जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल.

कर्क- ( शुभ रंग – चंदेरी )
सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आज गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. गृहिणी जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पडतील.

सिंह- ( शुभ रंग- जांभळा )
अति स्पष्टवक्तेपणा मुळे इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामात काही अडथळे संभवतात. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावर घेतील. तुमची काही गुपिते उघड होतील, कमी बोला.

कन्या- (शुभ रंग- पांढरा )
घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तुत्वाचा ही प्रभाव पडेल. भावंडात काही क्षुल्लक कारणाने गैरसमज होतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकूनच ठेवावी. प्रवासात खूपच दगदग होईल.

तूळ- ( शुभ रंग- भगवा )
आज वादविवादात तटस्थ राहा. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील. वैवाहिक जीवनात जुन्या स्मृतींना उजाळा द्याल.

वृश्चिक- ( शुभरंग- पिस्ता )
आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. काही अत्यावश्यक देणीही चुकवावी लागतील. हौस मौज करण्यावर थोडी मर्यादा येईल. काहीजण सहकुटुंब दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.

धनु- ( शुभ रंग – आकाशी )
वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. संततीकडून सुवार्ता येतील. जिवलग मित्र आज हिताचेच सल्ले देतील. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.

मकर- ( शुभ रंग- राखाडी )
कार्यक्षेत्रात वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. उद्दिष्टे पूर्ण करायची असतील तर कामाचे तास वाढवावे लागतील. नेतेमंडळी अधिकारांचा योग्य वापर करतील.

कुंभ – (शुभ रंग- तांबडा )
नवीन उपक्रमांची सुरुवात उद्याच केलेली बरी. गृहिणींचा आज    देवधर्माकडे ओढा असेल व देवही आज नवसास पावेल. अधिकारी वर्गाने अधिकारां पेक्षा कर्तव्याचा विचार केलेला बरा.

मीन – ( शुभ रंग – केशरी )
हाऊस करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. आज जोडीदाराच्या चुका काढू नका. वाहन चालवताना इतर काही विचार करू नका.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.