Today’s Horoscope 08 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – सोमवार – 08 मार्च 2021

  • शुभाशुभ विचार — 16 नंतर  चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 7:30 ते 9.30.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र -पूर्वाषाढा 20.40 पर्यंत नंतर उत्तराषाढा.
  • चंद्र राशी – धनु.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- निळा)

नोकरदारांवर कामाचा प्रचंड ताण राहील. घरात वडीलधारी मंडळी स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्हाला  एकांताची गरज भासेल. सत्संगाकडे पावले आपोआप वळतील.

वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. नोकरदारांनी आज नोकरीच्या ठिकाणी झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. धंद्यात मर्यादेबाहेर आर्थिक धाडस नको.

मिथुन – (शुभ रंग- हिरवा)

व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध राहतील. वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील आशादायी दिवस.

कर्क – ( शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढेल. काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. रुग्णांनी पथ्य नाही पाळले तर आजार बळावू शकतो. दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होण्याची शक्यता आहे.

सिंह- ( शुभ रंग – लाल)

नवोदित कलाकारांना पूर्वीच्या उमेदवारीचे फळ मिळेल भाग्यवान महिला आज मौल्यवान खरेदी करतील. चालू नोकरीत बदल करायचा असेल तर संधी चालून येतील.

कन्या – ( शुभ रंग- मोतिया )

आज प्रॉपर्टी विषयी काही व्यवहार मार्गी लागतील. प्रेम प्रकरणात मात्र नसती आफत होईल, सांभाळा. कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील.

तूळ – ( शुभरंग -स्ट्रॉबेरी)

दिवस धावपळीत जाईल एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. नव्या ओळखी होतील. स्थावर खरेदी व्यवहारात मात्र सावध राहणे गरजेचे आहे. परिवारातील सदस्यांच्या मागण्या पूर्ण करताना नाकी नऊ येतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- आकाशी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. गृहिणींना आज अचानक आलेल्या पाहुण्यांची ऊठबस करावी लागेल. प्रवासात दगदग होईल.

.

धनु – (शुभ रंग – भगवा )

अति स्पष्टवक्तेपणामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवला तर अनेक क्‍लिष्ट कामे सोपी होतील.
विरोधकही आज नमते घेतील.

मकर – (शुभ रंग- जांभळा)

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त आज बरीच पायपीट होणार आहे. पासपोर्ट, विजा विषयक कामे यशस्वी होतील.

कुंभ – ( शुभ रंग- नारिंगी )

सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल. विवाहविषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील. एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून लाभ पदरी पडेल.

मीन – ( शुभ रंग – मरून)

यशस्वी लोकांच्या सहवासात तुमच्या ही महत्वाकांक्षा वाढतील. घरगुती गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. आज जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.