Today’s Horoscope 08 September 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – बुधवार, दि. 08 सप्टेंबर 2021

  • शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तरा 15.55 पर्यंत नंतर हस्त.
  • चंद्र राशी – कन्या.

—————————————

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – लाल)

कार्यक्षेत्रात विरोधकांच्या कारवाया वाढलेल्या आहेत. एखादा शत्रू मित्रांमध्येच  लपलेला असू शकतो सावध राहा. नोकरीच्या ठिकाणी आज साहेबांना गुड मॉर्निंग जरूर करा.

वृषभ – ( शुभ रंग – क्रीम )

काही दुरावलेल्या हित संबंधात सुधारणा होईल. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. आज मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतिनेही तुम्ही भारावून जाल.

मिथुन -( शुभ रंग- पिस्ता )

व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. इच्छित ध्येय साध्य करता येतील. आशादायी दिवस.

कर्क – ( शुभ रंग मरून)

आज काही कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागेल. जमाखर्चाचा मेळ घालणे जरासे अवघड जाईल. आज तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाईल.

सिंह – ( शुभ रंग – सोनेरी)

आज काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्य उत्साह वाढेल महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही अग्रेसर राहाल. आपले म्हणणे विरोधकांना पटवून देऊ शकाल.

कन्या – ( शुभ रंग- हिरवा ) 

आज तुम्ही स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्याकडून घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील, स्वतःवर थोडा संयम ठेवा. इतरांचेही ऐकून घ्यायची तयारी ठेवा. अहंकार काही कामाचा नाही.

तूळ – (शुभ रंग डाळिंबी )

आज कार्यक्षेत्रात काही पेच प्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल. भक्तीमार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल. दूरचे प्रवास कार्यसाधक ठरणार आहेत.

वृश्चिक – ( शुभ रंग- राखाडी)

व्यवसायात उत्तम यश मिळून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकाल. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल.

धनु – ( शुभ रंग – निळा )

आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. सहकारी मंडळी तुमच्या मताचा आदर करतील. योग्यवेळी अधिकारांचा वापर कराल. इच्छित ध्येय साध्य होतील

मकर –  (शुभ रंग – मोरपंखी )

मोफत सल्लागार मंडळी बरीच भेटली तरीही आज ऐकावे जनाचे व करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फार मनावर घेऊ नका.

कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

नवीन व्यावसायिकांनी आर्थिक गुंतवणूक करताना आपली कुवत ओळखावी. कर्ज प्रस्ताव रखडणार आहेत. कार्यक्षेत्रात अंतर्गत राजकारणाचा  सामना करावा लागेल.

मीन – (शुभ रंग गुलाबी )

योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यांच्या जोरावर प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. योग्य माणसे संपर्कात येतील. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराची चूक काढण्याची चूक अजीबात करू नका.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४ 
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार )

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.