Today’s Horoscope 09 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 09 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शनिवार.

तारीख – 09.12.2023.

शुभाशुभ विचार – वृद्धी दिन.

आज विशेष – भागवत एकादशी.

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – चित्रा 10.43 पर्यंत नंतर स्वाती.

चंद्र राशी – तूळ.

—————————–

मेष – ( शुभ रंग – चंदेरी)

आज तुमचे मनोबल उत्तम राहील. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. जोडीदार आज तुम्हाला योग्य सल्ले देईल.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

ध्येय प्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. जुनी दुखणे अंगावर काढू नका. काही येणी असतील तर मागायला लाजू नका. गृहिणीसाठी अतिव्यस्त दिवस.

मिथुन – ( शुभ रंग- सोनेरी)

नोकरदार वरिष्ठांचे मूड सांभाळतील. कलाकारांच्या उमेदवारीस यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल.

कर्क – ( शुभ रंग – हिरवा)

आनंदी व उत्साही असा दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पडतील. घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील.

सिंह -( शुभ रंग – आकाशी)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील.

तूळ – ( शुभ रंग- जांभळा)

महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल. अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरू शकेल. घराबाहेर वावरताना रागावर लगाम गरजेचा राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग – निळा)

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज जेष्ठ मंडळींना सत्संगातून मनःशांती मिळेल.

धनु –  (शुभ रंग- चंदेरी)

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही आत्मविश्वासाने स्वीकाराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. आज तुम्हाला अहंकाराची बाधा होईल.

मकर- ( शुभ रंग – मरून)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल.

कुंभ – (शुभ रंग- केशरी)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. अधिकारांचा वापर जपूनच करा. उपासनेत खंड नको.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)

आज तुम्हाला थोडाफार थकवा जाणवेल. आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका दुर्लक्षित करणे हिताचे राहील.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.