Today’s Horoscope 09 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 09 February 2023
वार – गुरूवार.
09.02.2023
शुभाशुभ विचार- सामान्य दिवस.

आज विशेष- संकष्ट चतुर्थी. (चंद्रोदय 21.31)
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी 22.27 पर्यंत नंतर हस्त.
चंद्र राशी – कन्या.
—————————————-
मेष – (शुभ रंग – गुलाबी)
आज कार्यक्षेत्रामध्ये काही आव्हान देणारे पेच प्रसंग तुम्हाला सोडवावे लागतील. वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद असतील. भागीदारीत आर्थिक व्यवहार लिखित स्वरूपात करावेत.

वृषभ (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
महत्त्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. आज रुग्णांना असाध्य आजारावर योग्य डॉक्टर सापडतील. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून पालक आनंदी होतील.

मिथुन (शुभ रंग – मरून)
हाती असलेला पैसा जपून वापरा. मुलांचे ही अति लाड नकोत. आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊच नका.

कर्क (शुभ रंग – पांढरा)
आज तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी स्वतःचा वेळ व पैसा खर्च कराल. किरकोळ घर दुरुस्ती, वाहन दुरुस्ती असे खर्च उद्भवतील. सामाजिक कार्यकर्त्यांना समाजात मान मिळेल.

सिंह (शुभ रंग – हिरवा)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. आज लहान भावास कदाचित तुमच्या मदतीची गरज भासेल.

कन्या (शुभ रंग – लाल)
आज तुम्ही फारच हट्टीपणाने वागाल. सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली असली तरी पैशाची उधळपट्टी करू नका.

तूळ (शुभ रंग – चंदेरी)
आज विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळीचा परदेशातही नावलौकिक होईल.

वृश्चिक (शुभ रंग – डाळिंबी)
आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र दिलेली आश्वासने पाळतील. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकणे गरजेचे आहे.

धनु (शुभ रंग – मोरपंखी) Today’s Horoscope 09 February 2023
उच्चशिक्षित मंडळींना आज मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. आज मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील छान दिवस.

मकर (शुभ रंग – सोनेरी)
ऑफिसमध्ये आज अधिकारी वर्गास काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर आज तुम्ही ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

कुंभ (शुभ रंग – पांढरा)
कार्यक्षेत्रात मनाविरुद्ध घडलेल्या काही घटना तुम्हाला बेचैन करतील. आज वरिष्ठांशी नमते घ्या व सहकारी वर्गाशी जुळवून घ्या. आज सासुरवाडीकडून एखादा लाभ संभवतो.

मीन (शुभ रंग – आकाशी)
आज आपल्या मर्यादेत रहा, अति आक्रमकतेने नुकसान संभवते. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे पालक हिताचेच सल्ले देतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Maharashtra : देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.